IMPIMP

ESI Health Insurance Scheme | वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशात लागू होईल ESIC योजना, जाणून घ्या सरकारच्या ‘या’ निर्णयाचा जनतेला किती फायदा

by nagesh
ESI Health Insurance Scheme | esic to implement esi health insurance scheme across nation by 2022 end said by modi govt

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाESI Health Insurance Scheme | कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने 2022 च्या अखेरीस देशभरात आरोग्य विमा योजना ESI वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Modi Government सरकारच्या या निर्णयाचा नोकरदार वर्गातील लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. या योजनेच्या कक्षेत आणखी काही जिल्हे आल्याने लोकांना याचा लाभ मोठ्या प्रमाणात घेता येणार आहे. (ESI Health Insurance Scheme)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सध्या कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजना 443 जिल्ह्यांमध्ये पूर्णत: आणि 153 जिल्ह्यांमध्ये अंशत: लागू आहे. एकूण 148 जिल्हे अद्याप ईएसआय योजनेच्या कक्षेत नाहीत.

 

कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या ईएसआयसीच्या 188 व्या बैठकीत देशभरात वैद्यकीय सुविधा आणि सेवा पुरवठा प्रणालीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

देशभरात ईएसआय योजना लागू होईल

बैठकीत या वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशात ईएसआय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की या वर्षाच्या अखेरीस अंशत: ईएसआय योजनेत समाविष्ट असलेले आणि अद्याप त्यात समाविष्ट न झालेले सर्व जिल्हे या योजनेच्या कक्षेत आणले जातील. (ESI Health Insurance Scheme)

नवीन दवाखानासह शाखा कार्यालये (DCBOs) स्थापन करून आरोग्य सुविधा सेवा उपलब्ध करून दिल्या जातील, असे निवेदनात म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

23 नवीन रुग्णालये आणि 62 दवाखाने

नवीन दवाखानासह शाखा कार्यालये स्थापन करून आरोग्य सुविधा सेवा उपलब्ध करून दिल्या जातील, असे निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय ESIC ने देशभरात 23 नवीन 100 खाटांची रुग्णालये उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यापैकी महाराष्ट्रात सहा, हरियाणामध्ये 4, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी 2 रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत.

आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्णालय सुरू केले जाईल.
याशिवाय विविध ठिकाणी दवाखानेही सुरू करण्यात येणार आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, ही रुग्णालये आणि दवाखाने विमाधारक कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देऊ शकतील.

 

Web Title :-  ESI Health Insurance Scheme | esic to implement esi health insurance scheme across nation by 2022 end said by modi govt

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल मालक, बाऊंसरने धुतले ! दोघांचा वाढदिवस एक केक वादातून बाणेर येथील हॉटेलमध्ये भांडणे

Maharashtra Vidhan Parishad Election | मतदानादिवशीच एकनाथ खडसेंनी टाकला शाब्दिक बॉम्ब; म्हणाले – ‘भाजपचे अनेक आमदार संपर्कात, पण…’

Pune Crime | कोरेगाव पार्कमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; दोघांना अटक, 8 तरुणींची सुटका

 

Related Posts