IMPIMP

Amol Kolhe On PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींवर अमोल कोल्हेंची उपरोधिक टीका, पुण्यात आल्यावर इथले उद्योग गुजरातला पळवल्याची आठवण त्यांना होईल

by sachinsitapure

नारायणगाव : Amol Kolhe On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात महायुतीच्या (Mahayuti candidates) उमेदवारांसाठी जाहीर प्रचारसभा घेणार आहेत (PM Modi Sabha In Pune). रेसकोर्स येथे ही सभा होणार आहे (Pune Race Course) . या सभेवरून विरोधी पक्षांचे नेते पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. आम्ही मोदींचे तुतारी (Tutari) वाजवून स्वागत करू, असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे. तर शिरूर लोकसभेचे (Shirur Lok Sabha) मविआचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदीं यांच्यावर उपरोधिक टीका करताना म्हटले की, पुण्यात आल्यावर इथले उद्योग गुजरातला पळवल्याची त्यांना आठवण होईल.

अमोल कोल्हे यांनी आज शिरोली बुद्रुक येथे पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, तुषार थोरात, गुलाब पारखे, बाजीराव ढोले, सुनील मेहेर, सूरज वाजगे, अनंतराव चौगुले, तौशिब कुरेशीसह आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदींवर टीका करताना अमोल कोल्हे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार म्हणून महाराष्ट्राच्या तरुणांनी त्यांचे स्वागत केले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असेल. मात्र या तरुणांच्या नशिबातील रोजगार अत्यंत निष्ठुरपणे विशेष करून, वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, इतरही कंपन्यांचे अनेक प्रकल्प इतर राज्यांत नेले.

या कंपन्यांमुळेलाखो रोजगार उपलब्ध झाले असते. ते इतर राज्यांत विशेष करून गुजरातमध्ये नेण्यात आले, ही जी परिस्थिती आहे, हे विचार त्यांच्या मनात या भागात आल्यावर येतील, असे कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले, चीनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली तेव्हा अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडल्या, त्यातील एकही कंपनी भारतात आली नाही, ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. जिथे एकाधिकारशाही असते, त्या देशात परराष्ट्र गुंतवणूक होत नाही, हा जगाचा सिद्धांत आहे. देशात एकही गुंतवणूक न होणे म्हणजे तरुणांचा रोजगाराचा घास हिरावून घेणे आहे.

कांदा निर्यातबंदीबाबत अमोल कोल्हे म्हणाले, आज कांदा निर्यातबंदी उठवली, ती विशेष करून गुजरातचा कांदा निर्यात करण्यासाठी उठवली आहे. कांद्याची निर्यातबंदी झाली त्यावेळी राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी आवाज का उठविला नाही? आता गुजरातसाठी कांदा निर्यात बंदी कशी उठवली? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे कांदा निर्यातबंदीमुळे हजारो कोटींचे नुकसान झाले, त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न कोल्हे यांनी विचारला.

Supriya Sule – Pune Traffic Jam | पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुप्रिया सुळेंनी असा काढला मार्ग, चक्क दुचाकीचा आधार घेत गाठले इच्छित स्थळ, PHOTO व्हायरल

Related Posts