IMPIMP

चेकिंगदरम्यान ‘ब्रा’च्या हुक मुळे मेटल डिटेक्टरचा आवाज ! अंडरगार्मेंट्स चेकिंग वादात दोन शिक्षकांना अटक, NEET परीक्षेत दिला होता तपासणीचा आदेश

by nagesh
NEET | neet examination controversy 2 more people arrested

कोल्लम : वृत्तसंस्था केरळमध्ये मेडिकल प्रवेश परीक्षा (NEET) दरम्यान विद्यार्थीनींचे अंडरगार्मेंट काढून तपासणी केल्याच्या प्रकरणात दोन
शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही शिक्षक परीक्षा प्रभारी होते. त्यांनी कर्मचार्‍यांना तपासणीचा आदेश दिला होता. (NEET)

 

कोल्लम पोलिसांनुसार, महिला उमेदवारांच्या तक्रारीच्या आधारावर ज्या 2 लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये मारथोमा इन्स्टीट्यूट ऑफ आयटीचे व्हाईस प्रिन्सिपल पी. जी. कुरियन इसाक, एनईईटी परीक्षा केंद्र अधीक्षक आणि एनटीए पर्यवेक्षक डॉ. शामनाद यांचा समावेश आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय आहे प्रकरण?
केरळच्या कोल्लम जिल्ह्यात मेडिकल प्रवेश परीक्षा एनईईटीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थीनींच्या अंडरगार्मेंट्स काढून तपासणी केल्याचे प्रकरण समोर आले होते. असे म्हटले जात आहे की, परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनींच्या चेकिंगदरम्यान ब्रा च्या हुक मुळे मेटल डिटेक्टरचा बीप आवाज येत होता. यानंतर अंडरगारमेंट्स काढण्यास सांगण्यात आले. यानंतर एका विद्यार्थीनीच्या वडिलांनी प्रकरणाची तक्रार पोलिसात केली होती. यानंतर हे प्रकरण समोर आले होते. जवळपास 90 टक्के विद्यार्थीनींची ब्रा काढण्यात आली होती. (NEET)

5 जणांना अगोदरच अटक
विद्यार्थीनींचा आरोप होता की, जेव्हा त्या परीक्षा देऊन बाहेर पडल्या, तेव्हा त्यांनी पाहिले की, सर्वांच्या अंडरगारमेंट्स एकाच डब्यात ठेवल्या होत्या. या घटनेनंतर विद्यार्थीनींना स्वतःचा छळ झाल्याचे जाणवले. या प्रकरणात पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला होता.

 

तत्पूर्वी विद्यार्थीनींचे इनरवेअर काढण्याच्या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांनी अगोदरच अटक केली आहे. अटक लोकांमध्ये परीक्षा केंद्राच्या मार्थोमा कॉलेजच्या दोन महिला सफाई कर्मचारी आणि सेंटरच्या सुरक्षेसाठी असलेल्या तीन महिला कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फॅक्ट फायडिंग कमिटीची स्थापना
हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली.
वाद वाढल्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने चौकशीसाठी फॅक्ट फायडिंग कमिटीची स्थापना केली आहे.
फॅक्ट फायडिंग टीममध्ये NTA च्या सीनियर डायरेक्टर साधना पाराशर,
सरस्वती विद्यालय अरापुर्राच्या प्रिन्सिपल शैलजा ओ. आर, प्रगती अकॅडमी केरळच्या सुचित्रा यांचा समावेश आहे.
टीम चार आठवड्यात अहवाल सादर करणार आहे.

 

Web Title :- NEET | neet examination controversy 2 more people arrested

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आर्थिक व्यवहारावरुन अपहरण करण्याचा प्रकार, बिबवेवाडी पोलिसांकडून एकाला अटक

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार सोनु उर्फ आनंद धडे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 88 वी कारवाई

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

 

Related Posts