IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार सोनु उर्फ आनंद धडे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 88 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA Action on Nagpure gang in Mundhwa, Pune Police Commissioner Amitabh Gupta's 112th action till date

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीत टोळी तयार करुन दहशत निर्माण करणाऱ्या सोनु उर्फ आनंद सिदेधेश्वर धडे (Sonu alias Anand Sidedheshwar Dhade) टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का (MCOCA Action) Mokka कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त (Pune Police) अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 88 वी तर चालु वर्षात 25 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

टोळी प्रमुख सोनु उर्फ आनंद सिद्धेश्वर धडे (वय-22 रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे), नागेश सतीश शिंदे (वय-18), प्रेम गणेश चांदणे (वय-23), मंगल्या उर्फ मंगल बाबासाहेब भिसे (वय-23) आणि दोन विधीसंघर्षीत बालक (सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपींवर सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा (Attempted Murder) गुन्हा दाखल असून आरोपी अटकेत (Arrest) आहेत.

 

आनंद धडे व त्याच्या साथीदारांनी सहकारनगर, स्वारगेट (Swargate Police Station), कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत स्वत:चे तसेच टोळीचे वर्चस्व व्हावे व अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीने खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, गंभीर दुखापत, संगनमताने शरीराविरुद्ध गुन्हे, घातक शस्त्र घेऊन दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही. (Pune Crime)

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर (Senior Police Inspector Savlaram Salgaonkar)
यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale)
यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (Swargate Division ACP Sushma Chavan) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील,
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर,
सर्वेलन्स पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Commissioner Amitabh Gupta’s 88th MCOCA action till date against Pune’s Criminals; criminal Sonu alias Anand Dhade and his gang booked under Mokka

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

Railway Concession to Senior Citizen | ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात कधीपासून मिळणार सवलत? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी माहिती

Pune Crime | तरुणावर अनैसर्गिक लैगिक अत्याचार करुन त्याचे व्हिडिओ शुटींग करणार्‍या दोघांना अटक; कोंढव्यातील धक्कादायक घटना

 

Related Posts