IMPIMP

चारित्र्याच्या संशयावरून जावयाच्या घरी पत्नीचा निर्घृण खून, पती ताब्यात

by pranjalishirish
wifes-brutal-murder-suspicion-character-yavatmal-police

यवतमाळ : सरकारसत्ता ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना यवतमाळ शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर परिसरात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी Police घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

मेघना रविराज चौधरी (वय 35, रा. पिंपळगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर रविराज रमेश चौधरी याला पोलिसांनी Police ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जावई उमेश ठाकरे यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ठाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेघना आणि रविराज हे आपल्या पाच वर्षांच्या मुलासह जावई उमेश ठाकरे यांच्याकडे मुक्कामी आले होते. रविराज यांचा दोन
महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला मार लागला असल्याने उपचारासाठी तो यवतमाळ येथे आला होता. बुधवारी रात्री त्याने पत्नीचा गळा
आवळून चाकूने वार करून निर्घृण खून केला. या घटनेबाबत आरोपी रविराज याने जावई उमेश ठाकरे यांना माहिती दिली. ठाकरे यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी Police घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करीत आहेत.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Related Posts