IMPIMP

FIR On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 80-90 जणांवर 2 ठिकाणी गुन्हे दाखल

by sachinsitapure

हिंगोली : FIR On Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation Andolan) नेते मनोज जरांगे यांच्यावर राज्यभरात गुन्हे दाखल करण्याचा सरकारने सपाटाच लावला आहे. आता हिंगोलीमध्ये (Hingoli) जरांगे यांच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर झालेली ही कारवाई मराठा समाजासाठी धक्कादायक मानली जात आहे.

हिंगोलीच्या वसमत शहर (Wasamat City Police Station) आणि वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात (Wasamat Rural Police Station) मनोज जरांगे पाटील यांच्यासह ८०-९० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनोज जरांगे हे हिंगोलीतील वसमत येथे मराठा समाज संवाद बैठकीसाठी आले असताना विनापरवाना मोटरसायकल रॅली काढणे, विनापरवाना लाऊड स्पीकर लावणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत.

हिंगोलीच्या वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासह सुमारे ७० ते ८० जणांविरोधात तर वसमत शहर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासह सुमारे १० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Lok Sabha Elections 2024 | उर्मिला मातोंडकरला पाडणाऱ्या गोपाळ शेट्टींना डच्चू?

Related Posts