IMPIMP

‘नवीनत राणा यांनी आवाज उठवायला हवा होता, दीपाली चव्हाणांचा जीव वाचला असता’

by pranjalishirish
ncp leader rupali chakankar criticised navneet rana over deepali chavan suicide case

सरकारसत्ता ऑनलाइन :- अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही भाष्य केले. ‘खासदार नवनीत राणा Navneet Rana यांनी यावर आवाज उठवायला हवा होता. त्यांनी तसं केलं असतं तर आज दीपालीचा जीव वाचला असता’, असे त्या म्हणाल्या.

अजितदांदाच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला, म्हणाले – ‘मी लस घेतली, पण फोटोसाठी नौटंकी केली नाही, कारण…’

दीपाली चव्हाण यांनी काल सायंकाळी शासकीय निवासस्थानी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. तसेच या संदर्भात खासदार राणा Navneet Rana यांच्याकडेही तक्रार दिली होती. पण त्यावर नवनीत राणा यांनी कार्यवाही केली नाही. त्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निशाणा साधला.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून याबाबत भाष्य केले. त्यामध्ये चाकणकर म्हणाल्या, की ‘सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा Navneet Rana  यांच्या कानावर घातली, तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो’.

LIC ग्राहकांसाठी खूशखबर ! गृहकर्जाच्या EMI वर आता मिळणार 6 महिन्यांची सूट, जाणून घ्या…

दरम्यान, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही यावर ट्विट केले होते. ‘आज ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला’, असे म्हटले होते.

Also Read : 

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

Mumbai : भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी ! कारवाईचा इशारा देत म्हणाले…

पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी ठाण्यांत नवीन पीआयची नियुक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

Related Posts