IMPIMP

Maharashtra Political Crisis | शिंदे गटात नाराजी, विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं; बच्चू कडूंनी बोलून दाखवली खदखद

by nagesh
Maharashtra Political Crisis | bacchu kadu angry on eknath shinde and devendra fadnavis over ajit pawar join alliance

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी समर्थक आमदारांसह पक्षात बंडखोरी करुन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र, नवीन पक्ष सरकारमध्ये सामील झाल्याचे सरकारमधील मित्रपक्षांना रुचले नसल्याचे दिसत आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीला सरकारमध्ये (Maharashtra Political Crisis) घेत असताना विश्वासात घेतलं नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नाराजीचा स्फोट होऊ शकतो

महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे (Shiv Sena) मतदारसंघ फोडले जात होते, असा आरोप होता. मात्र आता ज्या नेत्यांवर शिंदे गटाकडून (Shinde Group) आरोप केले जायचे, त्याच नेत्यांना भाजपने (BJP) जवळ केले आहे. त्यामुळे नक्कीच शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा स्फोट होऊ शकतो, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. (Maharashtra Political Crisis)

डोक्यावर कुऱ्हाड मारुन घेऊ नये

शिवसेनेचे मतदारसंघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती, असा आरोप होता. मात्र त्या आरोपाला छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारुन घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये याची आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

उठावाचे भीष्म पितामह शरद पवार

शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) राजकारणातून निवृत्ती घ्यावी का?
असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, प्रश्न निवृत्तीचा नाही.
राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे आणि भाजपची वेगळी आहे.
ही जी विचारांची विभागणी झाली याचं दु:ख शरद पवार यांना असेलच. त्या वेदना लहान नाही. आम्ही त्यांचं सांत्वन करतो. सर्वात आधी उठाव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आता अजित पवार यांनी केला. या सर्व उठावाचे भीष्म पितामह शरद पवार आहेत. हे बंड शरद पवार यांच्यासाठी नवीन नाहीत. परंतु, अजित पवारांनी घेतलेला निर्णय अभिनंदनीय असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

Web Title : Maharashtra Political Crisis | bacchu kadu angry on eknath shinde and devendra fadnavis over ajit pawar join alliance

Related Posts