IMPIMP

ACB Trap News | 1 लाखाची लाच घेताना वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Senior clerk in anti-corruption net while accepting bribe of 1 lakh

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | 2 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1 लाख रूपयाची लाच घेणार्‍या वरिष्ठ लिपिकास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. (ACB Trap News)

विलास सोनुने Vilas Sonune (52, नेमणूक – गोविंद विष्णू महाजन विद्यालय, मलकापूर, जि. बुलढाणा. रा. नंदनवन नगर, मलकापूर, जि. बुलढाणा) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावाचा अनुकंप तत्वावरील नेमणूकीबाबतचा मान्यतेचा प्रस्ताव बुलढाणा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात मलकापूर शिक्षण समितीने सादर केला होता. (ACB Trap News)

सदर प्रस्तावास मान्यता मिळवून देण्यासाठी आरोपी विलास सोनुने यांनी तक्रारदाराकडे 2 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 1 लाख रूपये लाच घेण्याचे ठरले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. त्यावेळी विलास सोनुने यांनी सरकारी पंचासमक्ष 1 लाख रूपये लाच म्हणून घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारूती जगताप ,
अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उप अधीक्षक संजय चौधरी, पोलिस हवालदार विलास साखरे,
पोलिस अंमलदार विनोद लोखंडे, मो. रिजवान,
प्रविण बैरागी, महिला पोलिस अंमलदार स्वाती वाणी, पोलिस अंमलदार गौरव खत्री यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : ACB Trap News | Senior clerk in anti-corruption net while accepting bribe of 1 lakh

Related Posts