IMPIMP

Aurangabad Crime | डोक्यात फावडे मारून विभक्त पत्नीची हत्या; पैठणमधील घटना

by nagesh
 Kolhapur Crime News | 32 year old son went to sleep on the mountain after attacking his parents in the house

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन   मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना पैठण शहरात घडली. विभक्त पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात फावडे मारून खून (Aurangabad Crime) केला आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे पैठण शहरात मोठी खळबळ उडाली. ज्ञानेश्वर पुंडलिक पौळ असे आरोपी (Aurangabad Crime) पतीचे नाव आहे, तर मंदा पुंडलिक पौळ असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पौळ हा वीटभट्टी कामगार होता. मंदा पौळ यांच्यासोबत त्याचे लग्न झाले होते.
दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यांच्यात पटत नसल्याने तीन वर्षांपूर्वी दोघे वेगळे झाले होते.
मंदा मोलमजुरी करून आपला आणि तीन मुलांचा उदरनिर्वाह करत होत्या. या दाम्पत्याला तीन मुले आहेत.
विभक्त झाल्यावरदेखील ज्ञानेश्वर पौळ मंदा यांच्यावर सतत संशय घेऊन त्यांना त्रास देतच होता.
मंगळवारी सकाळी ज्ञानेश्वर पौळ शहरातील नेहरू चौकाकडे निघाला होता. त्याचवेळी मंदा यादेखील कामासाठी निघाल्या होत्या. यावेळी दोघेही समोरासमोर आल्याने ज्ञानेश्वर पौळ याने पुन्हा वाद घालायला सुरुवात केली. या वादात बाजूला सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेला फावडा उचलून ज्ञानेश्वरने तो मंदा यांच्या डोक्यात मारला. यात मंदा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ज्ञानेश्वर पौळ तिथून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस पौळ याचा कसून शोध घेत आहेत.

 

Web Title :- Aurangabad Crime | divorced wife killed by husband by hitting her head with a shovel police arrived at the scene

 

हे देखील वाचा :

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Pune Crime | हत्याराचा धाकाने लिंबू सरबत विक्रेत्याला लुटले; 7 जण ताब्यात, खडकीमधील घटना

Imli Serial Fame Hetal Yadav | ‘इमली’ फेम हेतल यादव यांचा भीषण अपघात

Pune PMPML Bus | ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत

 

Related Posts