IMPIMP

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

by nagesh
U-19 Women's T20 WC | shafali verma to lead india in under 19 women t20 world cup take place in south africa january

सरकारसत्ता ऑनलाईन  – U-19 Women’s T20 WC | दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारीदरम्यान ‘आयसीसी’ 19 वर्षांखालील महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताची ओपनर शफाली वर्मा (Shafali Verma) या संघाचे नेतृत्व करणार आहे. याचबरोबर 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी द्विपक्षीय मालिकेसाठीही संघाची घोषणा केली आहे. (U-19 Women’s T20 WC)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शफाली वर्माने 2019 मध्ये आंतराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. यामध्ये तिने आतपर्यंत 2 कसोटी, 21 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 46 ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ती आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेतही संघाचे नेतृत्व करणार आहे. हे सर्व पाचही सामने 27, 29, 31 तसेच, 2 आणि 4 जानेवारी रोजी प्रिटोरिया या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. 19 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताचा ड गटात समावेश आहे. या गटात भारतासह दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि स्कॉटलंड संघांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी पार पडणार आहे. (U-19 Women’s T20 WC)

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी संघ : – शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार),
ऋचा घोष, जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप,
अर्चना देवी, पाश्र्वी चोप्रा, तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री

 

19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी संघ :- शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, ऋचा घोष, जी त्रिशा,
सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पाश्र्वी चोप्रा,
तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राखीव खेळाडू :- शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

 

Web Title :- U-19 Women’s T20 WC | shafali verma to lead india in under 19 women t20 world cup take place in south africa january

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हत्याराचा धाकाने लिंबू सरबत विक्रेत्याला लुटले; 7 जण ताब्यात, खडकीमधील घटना

Imli Serial Fame Hetal Yadav | ‘इमली’ फेम हेतल यादव यांचा भीषण अपघात

Pune PMPML Bus | ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत

 

Related Posts