IMPIMP

Aurangabad Crime | नवविवाहित दाम्प्त्याची आत्महत्या; सिल्लोडमधील घटना

by nagesh
Aurangabad Crime | suicide of a newly married couple; Incidents in Sillode

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन   सिल्लोड तालुक्यातील घटांब्री (Aurangabad Crime) गावात एक हृद्यद्रावक घटना घडली आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. पत्नीने राहत्या घरात तर पतीने नदीच्या पुलाखाली गळफास घेत आत्महत्या (Aurangabad Crime) केली. विकास गणपत तायडे (वय 26) आणि सपना विकास तायडे (वय 21) अशी आत्महत्या करणाऱ्या जोडप्याची नावे आहेत.

 

विकास आणि सपना हे सिल्लोड तालुक्यातील घटांब्री गावातील रहिवाशी होते. त्यांचा आठ महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये विवाह झाला होता. विकास पोस्ट मास्तर होता, तर सपना गृहिणी होती. काही दिवसांपूर्वी विकास आणि सपना कुटुंबीयांपासून वेगळे झाले होते. त्यांनी वेगळे घर घेतले होते. ते तिथे वास्तव्य करत होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानादेखील दोघांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Aurangabad Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रविवारी विकास सिल्लोडला आपल्या दुचाकीची सर्व्हिसिंग करण्यासाठी गेला होता. तो पुन्हा घरी आला तेव्हा त्याला सपना गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात आढळून आली आणि त्याला धक्का बसला. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सपनाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे विकासनेदेखील अंभईजवळील बोजगाव येथील खेळणा नदीच्या पुलाखाली दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठविले. तसेच घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, तपास सुरू केला आहे. रविवारी रात्री घटांबी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Web Title :- Aurangabad Crime | suicide of a newly married couple; Incidents in Sillode

 

हे देखील वाचा :

Rajinikanth | रजनीकांत यांचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा ; म्हणाले “मराठीत काम करण्याची संधी मिळाली होती पण…”

Pune News | लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्रचिकित्सा व शास्त्रक्रिया शिबीर संपन्न

Bhagat Singh Koshyari | वादग्रस्त विधानावरून राज्यपालांचे शहा यांना स्पष्टीकरण

Pune NCP On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांना सन्मति दे भगवान प्रार्थना ! पत्रकारांवरील दबावाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुक आंदोलन

 

Related Posts