IMPIMP

Pune News | लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्रचिकित्सा व शास्त्रक्रिया शिबीर संपन्न

12 गरजू व्यक्तींवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया - मंजुश्री खर्डेकर

by nagesh
Pune News | On the occasion of the birth anniversary of Late BJP Leader Gopinathrao Munde, Free Ophthalmology camp was held

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | भारतीय जनता पार्टी प्रभाग 13, क्रिएटिव्ह फाउंडेशन, म. ग. आचवल ट्रस्ट आणि नयनतारा आय क्लिनिक च्या सहकार्याने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त भव्य नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष व मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी एरंडवणे येतील दहा चाळ येथे आयोजित केलेल्या शिबिरात तब्ब्ल 12 गरजू व्यक्तींवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिबिराचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. ह्या शिबिरास मा. नगरसेवक व भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, स्वीकृत सदस्य मितालीताई सावळेकर,सरचिटणीस प्राचीताई बगाटे, उद्योग आघाडीचे सरचिटणीस रामदासजी गावडे, ब्राह्मण संघाचे दत्तात्रय देशपांडे इ मान्यवर उपस्थित होते. (Pune News)

 

नयनतारा आय क्लिनिक चे डॉ. अनिल परांजपे आणि डॉ. मेधा परांजपे व त्यांच्या चमुने नेत्रतपासणी
करून शस्त्रक्रियेसाठीच्या रुग्णांची निवड केली. उद्याच ह्या सर्वांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे
मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष संगीताताई आदवडे
व संगीताताई वांद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आम्हाला सतत समाजातील
दुर्बल घटकांना मदत करण्याची शिकवण दिली, त्यालाच अनुसरून त्यांच्या जयंती दिनी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केल्याचे खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune News | On the occasion of the birth anniversary of Late BJP Leader Gopinathrao Munde, Free Ophthalmology camp was held

 

हे देखील वाचा :

Riteish Deshmukh – Genelia Deshmukh | अभिनेता रितेश देशमुखने सांगितले त्यांच्या नात्यातील सिक्रेट ; “जेनेलियाने नियम केलाय…”

Bhagat Singh Koshyari | वादग्रस्त विधानावरून राज्यपालांचे शहा यांना स्पष्टीकरण

Pune NCP On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांना सन्मति दे भगवान प्रार्थना ! पत्रकारांवरील दबावाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुक आंदोलन

Sanjay Raut | शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याबद्दल पंतप्रधानांनी एकनाथ शिंदेंची पाठ थोपटली का? – संजय राऊत

 

Related Posts