IMPIMP

Ahmednagar Crime | विम्याच्या रक्कमेसाठी स्वतःच्याच डुप्लिकेटला सर्पदंशाने मारलं अन् मेलेल्या भाच्यालाही केलं ‘जिवंत’; जाणून घ्या अहमदनगरमधील प्रकरण

by nagesh
Ahmednagar Crime | one man who come to US from ahmednagar kills one for insurance payout

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Ahmednagar Crime | विम्याची रक्कम मिळवण्यासाठी अमेरिकेतून अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) आलेल्या एका व्यक्तीने स्वतःच्याच डुप्लिकेटला सर्पदंशाने मारलं त्यानंतर पैसे मिळवण्यासाठी मित्राच्या मदतीने कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या भाच्यालाही जिवंत केलं. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे हा प्रकार सुरु असतानाच अहमदनगर पोलिसांनी हा कट उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी प्रभाकर भीमाजी वाघचौरे (वय ५४) आणि त्याच्या ४ साथीदारांना अटक केली आहे. ‘द सन’नं याबाबतच वृत्त दिल आहे.

 

प्रभाकर वाघचौरे हा गेल्या २० वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होता, गेल्याचवर्षी तो अहमदनगर येथे आला होता. त्याने विम्याचे ५० लाख डॉलर
मिळवण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला. त्यासाठी त्याने स्वतः डुप्लिकेट शोधण्यास सुरुवात केली. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याला त्याचा
डुप्लिकेट मिळाला. नवनाथ यशवंत आनाप हा वाघचौरे सारखाच हुबेहूब दिसत होता. नवनाथ बेघर असल्याने त्याला आमिष दाखवून वाघचौरेनं एका निर्जनस्थळी त्याला बोलावलं. तेथे कोब्राच्या दंशानं त्याला संपवलं आणि स्वत:चा मृत्यू झाल्याचं भासवलं. त्यानंतर प्रवीण नावाची व्यक्ती आली आणि हा मृतदेह माझ्या मामाचा असल्याचा दावा केला. प्रवीणनं शवविच्छेदनानंतर नवनाथचा मृतदेह ताब्यात घेतला. तर विमा कंपनीनं प्रविणकडे काही तपशील मागितले. वाघचौरेंच्या मृत्यूबद्दल चौकशी केली, तेव्हा कंपनीला संशय आला. त्यांनी पोलिसांना (Ahmednagar Crime) याबद्दल माहिती दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कंपनीच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. अहमदनगर पोलिसांचे एक पथक वाघचौरेंचा भाचा असणाऱ्या प्रवीणच्या घरी राजुरला पोहोचले. त्यावेळी जे सत्य समोर आले त्यामुळे पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली. कोरोनामुळे प्रवीणचा गेल्यावर्षीय मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत वाघचौरेची फोन रेकॉर्ड तपासले. त्यातून तो जिवंत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर सर्व आरोपीना अटक केल्यानंतर हा प्रकार (Ahmednagar Crime) उघडकीस आला.

 

Web Title : Ahmednagar Crime | one man who come to US from ahmednagar kills one for insurance payout

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील ‘ससून’च्या तोतया डॉक्टरकडून 29 वर्षीय तरूणीवर बलात्कार; अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Police Inspector Transfer | तडकाफडकी पोलीस दलातील 2 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द उद्योगपतीकडे 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला अटक

 

Related Posts