IMPIMP

Bank Officer Suicide Case | ‘बँक ऑफ न्यूयॉर्क’च्या महिला ऑफिसर आत्महत्येप्रकरणी पुणे कनेक्शन आलं समोर, प्रियकरला अटक

by nagesh
Pune Crime | An adult commits suicide by hanging himself from a tree on Sinhagad Ghat road of pune

इंदूर : वृत्तसंस्थाBank Officer Suicide Case | दोन दिवसांपूर्वी इंदूर शहरातील (Indore City) लसुडिया (Lasudia) परिसरात ‘बँक ऑफ न्यूयॉर्क’च्या (Bank of New York) महिला असिस्टंट वाइस प्रेसिडेंटने (Female Assistant Vice President) आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी (Bank Officer Suicide Case) पोलिसांनी संशयित आरोपी बॉयफ्रेंडला (Boyfriend) अटक (Arrest) केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना महिलेच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंडला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अक्षय भाटिया Akshay Bhatia (वय – 32 रा. इंदूर, मध्य प्रदेश – Madhya Pradesh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी बॉयफ्रेंडचे नाव आहे. तर शगून सचदेवा Shagun Sachdeva (वय – 35) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शगून ही मुळची दिल्ली (Delhi) येथील असून 2019 पासून आरोपी अक्षयसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (Live – in Relationship) राहत होती. मृत शगून ही बँक ऑफ न्यूयॉर्कच्या पुणे शाखेत (Pune Branch) असिस्टंट वाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत होती. तिला 1 मार्चपासून ऑफीस जॉइन करायचे होते. त्यामुळे तिने आरोपी अक्षयकडे पुण्याला जाण्याचा हट्ट धरला होता.(Bank Officer Suicide Case)

 

मात्र अक्षयने आई – वडिलांना सोडून पुण्यात येण्यास नकार दिला. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाले. या वादानंतर अक्षय रागाच्या भरात घरातून बाहेर निघून गेला. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास तो पुन्हा घरी आला. बराच वेळ दरवाजा वाजवून देखील शगूननं दरवाजा उघडला नाही. त्यामुळे अक्षयने सुरक्षा गार्डच्या मदतीने दरवाजा तोडला. यावेळी शगून गळफास (Hanging) घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
याप्रकरणी पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशी दरम्यान तो सध्या काहीच काम करत नसल्याचे समोर आलं.
मात्र, मागील बऱ्याच काळापासून तो आपला व्यवसाय सेटल करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समजली.

 

अक्षय याचे वडील गुडगाव येथील एका बँकेत कामाला आहे.
याठिकाणी आरोपी अक्षय आणि शगूनची ओळख झाली.
दोघंही घटस्फोटीत (Divorce) असून त्यांना मूलबाळ नव्हतं.
यानंतर दोघांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते दोघे इंदूर येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले.
दरम्यान पुण्याला जाण्यावरुन त्यांच्यात वाद झाले. यातूनच शगुनने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Bank Officer Suicide Case | woman assistant vice president of bank of new york in pune branch commit suicide

 

हे देखील वाचा :

Benefits Of Papaya | …म्हणून पपईला म्हंटलं जातं सुपरफूड, जाणून घ्या शरिरास होणार्‍या आश्चर्यकारक फायद्यांबाबत

Pune Crime | अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून उकळली 10 लाखांची खंडणी, आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांकडून अटक

Ajit Pawar | ‘पुण्यातील शाळा 2 मार्चपासून सुरु, पालकांना वाटलं तर त्यांनी…’ – अजित पवार

Ajit Pawar | पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय – अजित पवार

 

Related Posts