IMPIMP

Ajit Pawar | ‘पुण्यातील शाळा 2 मार्चपासून सुरु, पालकांना वाटलं तर त्यांनी…’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar on coronavirus in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोना (Pune Corona) रुग्णांमध्ये आता घट होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये 51 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळा (Pre-Primary school) 2 मार्चपासून सुरु होणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे (Corona Rules) पालन करुन शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. तसेच पालकांना वाटलं तर त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, पुण्यातील लसीकरण (Vaccination) वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. एक मार्चपासून पुण्यातील जम्बो हॉस्पिटल (Jumbo Hospital) बंद होणार आहेत. याबाबत पुणे महापौरांसोबत (Pune Mayor) बोलणं सुरु आहे. टास्क फोर्स (Task Force) आणि डॉक्टरांसोबतही चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या पाहता आता जम्बो हॉस्पिटलची गरज वाटत नाही. त्यामुळेच ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी होणारी रुग्णसंख्या पाहता शाळा सुरु (School Starts) करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे बालवाडीपासून 12 वी पर्यंतचे वर्ग 2 मार्चपासून सुरु करता येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

 

 

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांमध्येही आता घट होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना नियम शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

युक्रेनमधील नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न सुरु
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) सुरु असलेल्या युद्धामुळे (War) युक्रेनमधील भारतीय लोकांच्या (Indian People) सुरक्षेचा (Security) प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, 1200 ते 2000 लोक युक्रेनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.
366 पालकांना संपर्क साधून त्यांच्यासोबत बोलणं सुरु आहे.
त्यांना मोबाईल नंबर आणि ई मेल दिले आहेत. काही जण आज मुंबईत पोहचत आहेत.
नागरिकांना भारतात आणण्याचा प्रयत्न सुरु असून सरकार याचा खर्च करत आहे. त्याबाबत गैरसमज पसरवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar schools in pune will start from march 2

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय – अजित पवार

Mahashivratri 2022 | भगवान शंकराला पसंत आहे बेलपत्र, ‘या’ आयुर्वेदिक झाडाची पाने चावल्याने दूर होतील Diabetes सारखे 5 गंभीर आजार

Pune Crime | गॅस एजन्सीच्या मालकाला 14 लाखांचा गंडा ! पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपीला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

 

Related Posts