IMPIMP

Bhandara Crime | महाराष्ट्र पुन्हा हादरला! दिल्लीतील निर्भयाकांडायापेक्षा भयंकर घटना

by nagesh
Bhandara Crime | bhandara woman gang raped by 3 in jungle

भंडारा : सरकारसत्ता ऑनलाइन Bhandara Crime | दिल्लीतील निर्भया प्रकरणापेक्षा (Delhi Nirbhaya Case) भयंकर घटना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात (Bhandara Crime) घडली आहे. मदतीच्या बहाण्याने एका महिलेवर दोन जिल्ह्यात सामुहिक अत्याचार (Mass Atrocities) झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला आहे. कान्हाळमोह परिसरात 45 वर्षीय महिलेवर अमानुष पद्धतीने अत्याचार केला. पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन नराधमांना अटक (Arrest) केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पीडित महिला गोंदिया जिल्ह्यातील (Gondia District) गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. पतीने नांदवायला नकार दिल्याने ती बहिणीच्या घरी राहते. 30 जुलै रोजी तिचा बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. मदत करण्याच्या बहाण्याने एका कारचालकाने तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार (Rape) केला. 31 जुलै रोजी पळसगाव येथे अत्याचार करुन तिला जंगलात सोडून दिले. (Bhandara Crime)

पीडित महिला जंगलात भटकत असताना 1 ऑगस्ट रोजी भंडारा शहराजवळील कान्हालमोह येथील एका ढाब्यावर आली. त्यावेळी एका व्यक्तीने तिला घरी नेऊन सोडते असे सांगितले. मात्र, महिलेला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने विश्वास दिल्यावर महिला सोबत जाण्यास तयार झाली. त्यानंतर पहिल्या व्यक्तीसोबत दुचाकीवर बसून महिला निघाली. मात्र दोघांनी तिला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिथेच सोडून दोघांनी पळ काढला.

अत्याचारानंतर पीडित महिला रात्रभर तशीच पडत होती. तिने शुद्ध गमावली होती.
वेदनेने विव्हळत असताना गावातील काही तरुणाचे तिच्याकडे लक्ष गेले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.
महिला विवस्त्र होती व वेदनेने विव्हळत होती. पोटापासून पायापर्यंत रक्ताने शरीर माखले होते.
प्रचंड रक्तस्रावामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपींनी पीडितेच्या गुप्तांगावर धारदार शस्त्रांनी गंभीर जखमा केल्या असून महिलेच्या गर्भाशयापर्यंत जखमा झाल्या आहेत.
महिलेवर नागपूरातील मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Bhandara Crime | bhandara woman gang raped by 3 in jungle

हे देखील वाचा :

Aslam Sheikh | फडणवीसांच्या भेटीनंतर स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम?

Punit Balan Group | ‘खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणार’ – पुनीत बालन

Tea With Namkeen | तुम्ही चहा सोबत नमकीनचा आनंद घेता का? सोडून द्या ही सवय, अन्यथा होईल असे नुकसान

Related Posts