IMPIMP

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : हिंजवडीत प्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 3 तरुणींची सुटका (Video)

by sachinsitapure

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch | अवैध धंदे करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Police) गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाने (Pimpri Chinchwad AHTU) कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी (दि.24) हिंजवडी पोलीस स्टेशनच्या (Hinjewadi Police Station) हद्दीतील सुस-नांदे रोडवरील (Sus Nande Road) डिन्स रेसिडन्सी येथील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश (Prostitution Racket Bust) करुन एकाला अटक केली असून तीन तरुणींची सुटका केली आहे. ही कारवाई रात्री सव्वा आठच्या सुमारास केली.

पोलिसांनी डिन्स रेसिडेन्सी येथील फ्लॅट नंबर 302 येथे छापा टाकून तीन तरुणींची सुटका केली आहे, तर एका आरोपीला अटक केली आहे. सूर्यकांत पंडित देवरे (वय 49 रा. फ्लॅट नंबर 302, तिसरा मजला, डीन्स रेसिडेन्सी, सुस नांदे रोड, बावधन पुणे मूळ रा. खर्डी रेल्वे स्टेशन, ता. शहापूर, जिल्हा ठाणे)  याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात आयपीसी 370(3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलमा अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश सिताराम कारोटे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिन्स रेसिडेन्सी मधील तिसरा मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीची पोलिसांनी खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता वेश्याव्यवसाय करताना तीन तरुणी दिसून आल्या. पोलिसांनी या तीनही तरुणींची सुटका करून सूर्यकांत देवरे याला अटक केली.

आरोपीने तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून या ठिकाणी वेश्याव्यवसाय करून घेत होता. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी 28 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण,  पोलिस अंमलदार, सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके,  वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने  यांच्या पथकाने केली आहे.

Nashik Police News | नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गुटख्यासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Related Posts