IMPIMP

CBI Anti Corruption Trap | 2 लाखाची लाच घेताना विभागीय अभियंता आणि 40 हजाराची लाच घेताना कार्यालय अधीक्षक CBI च्या जाळ्यात

by nagesh
CBI Anti Corruption Trap | railway divisional engineer caught taking bribe rs 2 lakh and office superintendent also caught

भुसावळ :  CBI Anti Corruption Trap | वर्कऑर्डर देण्यासाठी तब्बल 2 लाखांची लाच (bribe) घेताना मध्य रेल्वेचा भुसावळ येथील (Bhusawal DRM Office) विभागीय अभियंता (railway divisional engineer) आणि त्याचा कार्यालयातील मुख्य कार्यालय अधीक्षकाला (office superintendent) 40 हजाराची लाच घेताना सीबीआयच्या (CBI Anti Corruption Trap) पथकाने सापळा रचून अटक केली. विभागीय अभियंता एम.एल. गुप्ता (M.L. Gupta) व मुख्य कार्यालय अधीक्षक संजीव रडे (Sanjeev rade) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ही कारवाई सोमवारी (दि.16) दुपारी 12 च्या सुमारास गुप्ता याच्या कार्यालयात करण्यात आली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तक्रारदार यांनी कामाची वर्कऑर्डर (Work order) देण्यासाठी गुप्ता याने 2 लाख तर संजीव रडे याने 40 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याची तक्रार सीबीआयकडे केली. मागील आठ दिवसांपासून सीबीआयचे 18 अधिकाऱ्यांचे पथक भुसावळमध्ये (Bhusaval) होते. सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास भुसावळ येथील गुप्ता याच्या कार्यालयात ही करावाई केली. सीबीआयच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून कारवाईनंतर डीआरएम कार्यालयात (DRM office) शुकशुकाट पसरला.

 

विभागीय अभियंता एम.एल. गुप्ता व मुख्य कार्यालय अधीक्षक संजीव रडे यांना लाच घेताना रंगेहाथ
पकडल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास सीबीआयचे पथक दोघांच्या घरी पोहचले. सीबीआयच्या
पथकांकडून गुप्ता आणि रेडे यांच्या घराची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title : CBI Anti Corruption Trap | railway divisional engineer caught taking bribe rs 2 lakh and office superintendent also caught

 

हे देखील वाचा :

MNS | मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा; म्हणाले – ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू’

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Mumbai Crime | वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा परदेशात नेऊन केला 8 वेळा गर्भपात, सासरच्या मंडळींवर FIR दाखल

 

Related Posts