IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold price hike while silver falls check todays 16 august 2021 gold rate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–   Gold Silver Price Today | सातत्याने चढउतार होणाऱ्या सोन्याच्या दरात (Gold Silver Price Today) मागील काही दिवस घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या किमतीत देखील किरकोळ घसरण झाली. मात्र, सध्या सोन्याच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX ) नुसार सोन्याचा वायदे किंमत 0.08 टक्के अर्थात 37 रुपयांनी वाढून तो 46, 977 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली आहे. तर, चांदीची किंमत 0.09 टक्के अर्थात 56 रुपयांची घसरण झाली आहे. यांनतर सध्या चांदीचा भाव 63,182 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

गतवर्षी सोन्याचा भाव (Gold Price) उच्चांकी स्तरावर होता, साधारण 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. मात्र, गेल्या वर्षीची तुलना करता यंदा सोन्याच्या भावात (Gold Price) 9223 रुपयांची घसरण आहे. या दरम्यान, गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात साधारण 950 रुपयांची घसरण झालीय.
तसेच, चांदीच्या किंमतीत (Silver Price) साधारण 4100 रुपयांची घसरण झालीय.
कोरोना, डेल्टा प्लस वेरिएंटच्या वाढत्या प्रभावामुळे व्यावसायिक लोक चिंतेत आहेत.
शुक्रवारी शुद्ध सोन्याचा दर 46,702 रुपये 10 ग्रॅम इतका होता.
तर चांदीचा भाव 62,612 रुपये प्रति किलोग्रॅम होता.
अशी माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दिलीय.

 

या दरम्यान, सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today) फक्त मिस्ड कॉलच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल.
या सेमेजमध्ये सोन्याच्या आताच्या दराबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे.
तसेच, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार केलं आहे.
‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहकाच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकणार आहे.

 

Web Title : Gold Silver Price Today | gold price hike while silver falls check todays 16 august 2021 gold rate

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा परदेशात नेऊन केला 8 वेळा गर्भपात, सासरच्या मंडळींवर FIR दाखल

Afghanistan Crisis | रक्तपात टाळण्यासाठीच अफगाणिस्तानातून पलायन; फेसबूक पोस्टद्वारे अश्रफ घनीनीं केला खुलासा

Haiti Earthquake | ‘हैती’त भूकंपाचं तीव्र पडसाद, अनेक इमारती जमीनदोस्त तर आतापर्यंत 1297 जणांचा मृत्यू

 

Related Posts