IMPIMP

Maharashtra TET Scam | शिंदे गटातील बड्या नेत्याची दोन्ही मुलं टीईटी घोटाळ्यात ? यादी व्हायरल होताच अब्दुल सत्तार म्हणाले…

by nagesh
Abdul Sattar | abdul sattar on compulsion of vande mataram replacing hello in government offices

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात (Maharashtra TET Scam) माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील बडे (Shinde Group) नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलांचं टीईटी प्रमाणपत्र (TET Certificate) रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली. मात्र बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचा पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करा. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, असं सत्तार यांनी म्हटलं. राज्यातील टीईटी घोटाळा प्रकरणाची (Maharashtra TET Scam) नीट चौकशी व्हावी. कुणाचीही बदनामी करण्याचं काम कुणी करु नये. चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सत्तार यांनी केली.

 

सध्या सोशल मीडियावर एक यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये हिना कौसर अब्दुल सत्तार शेख (Hina Kausar Abdul Sattar Shaikh) आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख (Uzma Nahid Abdul Sattar Shaikh) अशी दोन नावे आहेत. या नावांवर देखील सत्तार यांनी आक्षेप घेतला आहे. मी अब्दुल सत्तार आहे त्यांच्या नावात पुढे शेख लावले आहे. या नावांतही तफावत असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी – अंबादास दानवे

यासंदर्भात शिवसेनेचे नेते (Shiv Sena Leader) आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले,
या प्रकरणाची (Maharashtra TET Scam) सखोल चौकशी व्हावी.
यात अब्दुल सत्तारांच्याच नाहीत तर अनेकांची नावं आहेत. यात विरोधकांचं षडयंत्र असण्याचा प्रश्न नाही.
आम्ही या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी करत आहोत, कोणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा व्हावी.
या प्रकरणाची चौकशी सुरु असून यातच हे आढळलं आहे. सत्तारांच्या मुलांचं शिक्षण आहे,
त्यांना त्यामुळंच नियुक्ती मिळाली असेल.
मी मुलांवर आरोप करणार नाही परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, असं दानवे म्हणाले.

 

Web Title : –  Maharashtra TET Scam | maharashtra tet scam shiv sena eknath shinde group mla abdul sattar son daughter connection with scam

Related Posts