IMPIMP

Murder in Dhule | नवीन दुचाकी खरेदी करुन घरी परतणाऱ्या डॉक्टरचा सपासप वार करुन खून

by nagesh
Murder in Dhule | youth killed by anonymous people while he was returning home after buying new bike in dhule

धुळे : सरकारसत्ता ऑनलाइन पोळा सणाचे औचित्याने नवी दुचाकी घेऊन घराकडे निघालेल्या डॉक्टरचा अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात (Murder in Dhule) घडली आहे. खूनाची ही घटना धुळे जिल्ह्यातील (Murder in Dhule) शिंदखेडा तालुक्यात घडली आहे. शिंदखेडा तालुक्यातील (Shindkheda taluka) दरणे गावातील डॉ. प्रेमसिंग राजेंद्र गिरासे (Premsingh Rajendra Girase) असे या 21 वर्षीय मयत तरुण डॉक्टराचे नाव आहे. अज्ञातांनी खून केल्यानंतर नवीन मोटारसायकल (New motorcycle) व मोबाईल हिसकावून पोबारा केला आहे. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात (Shindkheda Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

डॉ. प्रेमसिंग शिंदखेडा येथे शोरुममध्ये नवीन दुचाकी खरेदी करण्यासाठी गेले होते.
व्हेटिनरी डॉक्टर (Veterinary doctor) असलेले प्रेमसिंग पोळा सणाच्या दिवशी नवीन प्लॅटिना (Platinum) दुचाकी घेऊन घराकडे परतत होते.
चिमठाणे गावाजवळ तीन संशयितांनी त्यांना रस्त्यात आडवले.
यावेळी संशयितांनी प्रेमसिंग यांचा मोबाईल आणि रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला.
यावेळी झालेल्या झटापटीत संशयितांनी चाकूने प्रेमसिंग यांना भोसकले.
घटनेनंतर आरोपी नवी दुचाकी घेऊन पळून गेले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेमसिंग यांना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पाहिले.
त्यानंतर काही नागरिकांनी त्यांना तातडीने चिमठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक झाली होती.
त्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात (Dhule District Hospital) हलवण्यात आले.
रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच दरणे गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तसेच संतप्त जमावाने धुळे दोंडाईचा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
खून प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल व आरोपींना तात्काळ अटक केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित (SP Chinmay Pandit) यांनी दिली.
त्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने दोन तासात या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे.

 

Web Title : Murder in Dhule | youth killed by anonymous people while he was returning home after buying new bike in dhule

 

हे देखील वाचा :

Sadabhau Khot | आ. सदाभाऊ खोतांच्या मुलाचा युवा आघाडी अध्यक्षाच्या घरात सशस्त्र ‘राडा’, 4 जणांवर FIR

7th Pay Commission | मोदी सरकारकडुन दिवाळी दरम्यान ‘या’ कर्मचाऱ्यांना मिऴु शकते मोठी भेट

Crime in Virar | भल्या पहाटे मंदिरात जाताना बड्या बिल्डरचा निर्घृण खून, शहरात प्रचंड खळबळ

 

Related Posts