IMPIMP

Pune Chandan Nagar Crime | मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगाराला चंदननगर पोलिसांकडून अटक

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Chandan Nagar Crime | दोन दिवसांपूर्वी काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने संधी साधून मालकाच्या घरात चोरी करुन पळून गेला. आरोपीने घरमालकाच्या घरातील कपाटात ठेवलेला लॅपटॉप व रोख रक्कम असा एकूण एक लाख 41 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत तक्रार प्राप्त होताच चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) अवघ्या दोन तासात आरोपीला पुणे स्टेशन येथून अटक केली.

मोडाराम भोमाराम काकड (वय-28 रा. हेमपुरा खिंवसर, जि. नागोर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्य़ादी यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. आरोपी दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे कामाला लागला होता. फिर्यादी घरात नसल्याची संधी साधुन आरोपीने घरातील दीड लाखांचा मुद्देमाल चोरुन पळून गेला. याबाबत फिर्यादी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.

आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शिवाजी धांडे व शेखर शिंदे यांना माहिती मिळाली की, आरोपी मोडाराम हा पुणे रेल्वे स्टेशन येथून रेल्वेने मुळ गावी जाणार आहे. त्यानुसार तपास पथकाने पुणे स्टेशन येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. मोडाराम राजस्थानला जाणाऱ्या धावत्या रेल्वेमध्ये चढत असताना तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिला. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात आरोपीला अटक करुन एक लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 विजय मगर (DCP Vijaykumar Magar), सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील (ACP Sanjay Patil0, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील (Sr PI Manisha Patil), पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड (PI Pandit Rejitwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर (PSI Tanhaji Shegar), पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोने, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाणे यांच्या पथकाने केली.

Supriya Sule To Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी जावे; सुप्रिया सुळे यांचा टोमणा

Related Posts