IMPIMP

Pune Crime | अपहाराच्या पैशांतून खरेदी केली 66 लाखांची BMW ! परदेशातील बँक खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात वळवले

by nagesh
Pune Crime | BMW worth Rs 66 lakh bought with embezzlement money! The money was diverted from a foreign bank account to his own account

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | एकाच कंपनीत कामाला असलेल्या सहकारी कर्मचा-‍यांच्या लॉग इन आयडीचा वापर करून तरुणाने तीन कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार केला. आरोपीने परदेशातील बँक खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात वळवले व त्यातून ६६ लाखांची बीएमड्ब्ल्यू घेतल्याचे तपासातून (Pune Crime) निष्पन्न झाले आहे.

 

बीएमड्ब्ल्यू कारसह आरोपीने फ्लॅट, दुचाकी तसेच दागिन्यांची देखील खरेदी केली आहे. आदित्य राजेश लोंढे Aditya Rajesh Londhe (वय २९, रा. यशोदा हौसिंग सोसायटी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे कंपनीत अपहार केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात कार्थिक गणपथी उर्फ कार्थिक सुब्रमनीयन Karthik Ganapathi aka Karthik Subramanian व इतर बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, राहुल रतनलाल कौल (वय ४१) यांनी सायबर पोलिसांत (Cyber Crime Police Station) फिर्याद दिली आहे. लोंढे यांच्याकडून पोलिसांनी ॲपल कंपनीचा मोबाईल व लॉपटॉप, स्कोडा कंपनीची कार यासह इतर ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोंढे याने तो काम करीत असलेल्या कंपनीतील एका सहकारी कर्मचार्‍यांच्या लॉग इन आयडीद्वारे २४ गैरव्यवहार करत कंपनीची तीन कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक केली. संबंधित रक्कम त्याने परदेशातील एका बँक खात्यात पाठवले व त्यानंतर ते स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

लोंढे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. कार्थिक याने लोंढेच्या बँख खात्यात २ कोटी ३७ लाख ८७ हजार रक्कम पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आदित्य याने अपहार केलेल्या ३ कोटी ६८ लाख रुपयांमधून कोंढवा येथून ६६ लाख ३ हजार ७७७ रुपयांची बीएमडब्ल्यू कार, ११ लाख ४७ हजार ६०० रुपये किंमतीची उंड्री येथे फिलीप्स व लिंडा फिलीप्स यांच्या नावे फ्लॅट याखेरीज सोन्याच्या दागिन्यांची तसेच दुचाकीची खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
त्याच्या बँक खात्यावर विदेशातून पैसे जमा झाले असून गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्वरुपाची असल्याचे
त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव (Government Advocate Vijay Singh Jadhav) यांनी केली.
न्यायालयाने ती मान्य करत सहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

Web Title : Pune Crime | BMW worth Rs 66 lakh bought with embezzlement money! The money was diverted from a foreign bank account to his own account

 

हे देखील वाचा :

Pimpri Crime | रस्ता क्रॉस करताना ‘बेन्झ’ बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

National Nutrition Week 2021 | ‘या’ 8 गोष्टींमध्ये सर्वात जास्त पोषकतत्व, तुम्ही देखील खाण्यास सुरूवात करा; जाणून घ्या

UGC NET Exam Dates | NTA ने बदलली यूजीसी नेट परीक्षेची तारीख, जाणून घ्या नवीन शेड्यूल

 

Related Posts