IMPIMP

UGC NET Exam Dates | NTA ने बदलली यूजीसी नेट परीक्षेची तारीख, जाणून घ्या नवीन शेड्यूल

by nagesh
UGC NET Exam Dates | ugc net exam 2021 nta revises december and june exam dates

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  UGC NET Exam Dates | नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने डिसेंबर 2020 आणि जून 2021 सायकलसाठी यूजीसी नेट परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे. एनटीएने परीक्षेचे रिवाईज्ड शेड्यूल ऑफिशियल वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जारी केले (UGC NET Exam Dates) आहे.

 

 

आता 6 ते 8 आणि 17 ते 19 ऑक्टोबर

यूजीसी नेटची परीक्षा आता 6 ते 8 आणि 17 ते 19 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केली जाईल. अगोदर ही परीक्षा 6 ते 11 ऑक्टोबरपर्यंत होणार होती. एनटीएने आपल्या एका नोटीसमध्ये म्हटले की, एजन्सीला विद्यार्थ्यांकडून समजले की, 10 ऑक्टोबरला इतरही काही प्रमुख परीक्षा आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी, यूजीसी-नेट डिसेंबर 2020 आणि जून 2021 सायकलच्या काही तारखांचे रिशेड्यलू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

5 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करा

ज्या उमेदवारांनी अजूनपर्यंत या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेले नाही, त्यांनी ऑफिशियल वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन 5 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करावे. एग्झाम फी जमा करण्याची तारीख 6 सप्टेंबर आहे. तसेच, अ‍ॅप्लीकेशनमध्ये करेक्शन करण्यासाठी 7 ते 12 सप्टेंबरपर्यंत विंडो उघडली जाईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

अर्जातील चूका दुरूस्त करू शकता

या दरम्यान सर्व उमेदवार आपल्या अ‍ॅप्लीकेशनमध्ये झालेल्या चूका दूरूस्त करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या सोप्या स्टेपच्या मदतीने यूजीसी नेट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

 

UGC NET 2021 Registration : या स्टेप्सने करा रजिस्ट्रेशन

 

स्टेप

1 :
ऑफिशियल वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.

2 : वेबसाइटवर दिलेल्या Application Form च्या लिंकवर क्लिक करा.

3 : आता New Registration च्या लिंकवर क्लिक करा.

4 : यानंतर नाव, वडिलांचे नाव, मोबाइल, ईमेल आणि इतर माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.

5 : आता लॉग इन करा अ‍ॅप्लीकेशन फॉर्म भरा, फोटो आणि साइन अपलोड करा.

6 : नंतर अर्ज शुल्क जमा करा.

 7 : सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अ‍ॅप्लीकेशनची प्रींट घ्या.

अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना 1000 रुपये आणि आरक्षित श्रेणी जसे की ओबीसी, EWS मधील उमेदवारांना 500 रुपये द्यावे लागतील. तर एससी, एसटी आणि ट्रांसजेंडर कॅटेगरीत 250 रुपये शुल्क द्यावे लागेल.

 

Web Title : UGC NET Exam Dates | ugc net exam 2021 nta revises december and june exam dates

 

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | आगामी 4 दिवस पुण्यात मुसळधार; 15 जिल्ह्यांना आज ‘Alert’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 244 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime Branch Police | पत्नीला भेटायला पुण्यात आला अन् गुन्हे शाखेच्या जाळ्यात आडकला, सराईत वाहन चोराकडून 18 दुचाकी जप्त

 

Related Posts