IMPIMP

Pune Crime | कुटुंबाला डावलून आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीची आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | कुटुंबाचा विरोध डावलून आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील खडकवासला भागात घडली आहे. तरुणीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती (Pune Crime) मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रांजल किसन रासकर (वय 22, रा. खडकवासला, मूळ रा. पिंपळनेर, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रांजल हिने दोन वर्षांपूर्वी कुटुंबाचा विरोध डावलून प्रेमविवाह केला होता. प्रांजलचा पती रात्री घरी आला असता घराचे दार आतून बंद होते. त्याने दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्याने घरमालकाला याबाबत सांगितले. (Pune Crime)

 

घरमालकाने याची माहिती हवेली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनस्थळी दाखल होऊन घराचा दरवाजा तोडला.
त्यावेळी प्रांजल हिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घराची तपासणी केली.
प्रांजलने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली नसल्याने तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे
समजू शकले नाही. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Suicide of a young woman who entered into an inter-caste love marriage without family; Shocking incident in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अक्षर सुंदर नसल्याने मुलाला बेदम मारहाण; शिक्षिकेवर FIR, पुण्यातील प्रकार

Taj Mahal | ताज महालसंबंधीची याचिका न्यायालयाने फेटाळली

Vasant More | वसंत मोरे मनसे सोडण्याच्या तयारीत?; लग्नसमारंभात अजित पवारांची घेतली भेट

Jalgaon Dudh sangh | सासूबाईंच्या विरोधात सूनबाई, जळगाव दूधसंघ निवडणूक; रक्षा खडसेंचा मंदा खडसेंविरोधात प्रचार

 

Related Posts