IMPIMP

Vasant More | वसंत मोरे मनसे सोडण्याच्या तयारीत?; लग्नसमारंभात अजित पवारांची घेतली भेट

by nagesh
Vasant More | mns leader vasant more after meeting ajit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसेच्या मस्जिदीवरील भोंग्यांविरोधी आंदोलनामध्ये पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतल्यामुळे चर्चेत असलेले मनसेचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना वसंत मोरे (Vasant More) यांनी संकेत दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वसंत मोरे (Vasant More) यांनी अजित पवारांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याची बाब मान्य केली. मी सध्या मनसेतच आहे, पण अलीकडे मला पक्षसंघटनेतील लोकांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे, असे वसंत मोरे यांनी सांगितले. त्यामुळे वसंत मोरे भविष्यात मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

वसंत मोरेंनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका लग्नसमारंभात अजित पवारांची भेट झाली, त्या भेटीत अजित पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण दिले.
तसेच बाकीच्या चर्चेसाठी नंतर भेटू असे सांगितले आहे.
पुढे मनसेबद्दल बोलताना मोरे म्हणाले, मला अजून तरी राजसाहेब प्रिय आहेत. परंतु, आता मला पक्षातील बाकीच्यांचा त्रास जाणवू लागला आहे. पूर्वी जो त्रास होत नव्हता, तो आता जाणवत आहे. मला स्टेजवर बोलवायचे आणि बसवून ठेवायचे, मी काय शो पीस नाही ना, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

 

वसंत मोरे यांचा खंदा समर्थक म्हणून ओळखले जाणारे माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश माझिरे
यांची राज ठाकरे यांनी अलीकडेच पदावरून हकालपट्टी केली होती.
त्यानंतर त्यांच्या ४०० कार्यकर्त्यांनीही मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.
याबरोबरच जर वसंत मोरेसुद्धा पक्ष सोडून गेले, तर हा मनसेसाठी मोठा धक्का असेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vasant More | mns leader vasant more after meeting ajit pawar

 

हे देखील वाचा :

Jalgaon Dudh sangh | सासूबाईंच्या विरोधात सूनबाई, जळगाव दूधसंघ निवडणूक; रक्षा खडसेंचा मंदा खडसेंविरोधात प्रचार

Mumbai Crime | वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील फिल्म बनवणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या

 

Related Posts