IMPIMP

Taj Mahal | ताज महालसंबंधीची याचिका न्यायालयाने फेटाळली

by nagesh
Taj Mahal | the supreme court rejected that petition regarding taj mahal

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इतिहासाच्या पुस्तकांत ताजमहाल (Taj Mahal) संदर्भात देण्यात आलेली माहिती खोटी असल्याचा दावा करत, ती हटविण्याची मागणी करण्यात आलेली याचिका सुनावणीस घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेत ताज महालचे (Taj Mahal) वय निश्चित करण्याबरोबरच बांधकामासंबंधी इतिहासाच्या पुस्तकात देण्यात आलेली चुकीची माहिती हटविण्याचे निर्देश पुरातत्त्व विभागाला देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका सुनावणीयोग्य नाही, असे म्हटले आहे. ही कशा प्रकारची याचिका आहे? असा प्रश्न यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला. ऐतिहासिक तथ्य खरे की खोटे, हे न्यायालय कसे तपासणार? असा प्रश्न उपस्थित करीत न्यायालयाने याचिका मागे घेण्यास सांगितले. या प्रकरणी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे जाण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वीदेखील न्यायालयाने अशाच एका याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता.

 

Web Title :- Taj Mahal | the supreme court rejected that petition regarding taj mahal

 

हे देखील वाचा :

Vasant More | वसंत मोरे मनसे सोडण्याच्या तयारीत?; लग्नसमारंभात अजित पवारांची घेतली भेट

Jalgaon Dudh sangh | सासूबाईंच्या विरोधात सूनबाई, जळगाव दूधसंघ निवडणूक; रक्षा खडसेंचा मंदा खडसेंविरोधात प्रचार

Mumbai Crime | वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील फिल्म बनवणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

 

Related Posts