IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भोसरी पोलिसांकडून प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त, एकाला अटक

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहर व परिसरात अवैध गुटख्याची (Gutkha) वाहतूक, विक्री आणि साठा करुन ठेवणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून (Pimpri Chinchwad Police) कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याचा साठा (Stock Of Gutkha) भोसरी पोलिसांच्या (Bhosari Police) पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.3) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गव्हाणे वस्ती येथील श्री समर्थ जनरल स्टोअर्स येथे करण्यात आली.

याबाबत पोलीस अंमलदार प्रभाकर हनुमंत खाडे (वय-39) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नितेश अनंदा नवघरे (वय-39 रा. पारिजात कॉलनी, चक्रपाणी रोड, भोसरी, मुळ रा. मु.पो. वारा जहागीर ता.जि. वाशिम) यांच्यावर आयपीसी 328, 188, 269, 270, 272, 273 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तपास पथक पेट्रोलींग करत होते. त्यावेळी गव्हाणे वस्तीतील श्री समर्थ जनरल स्टोअर्स या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून चार लाख 52 हजार 150 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करुन नितेश नवघरे याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

चाकणमध्ये गांजा जप्त

चाकण : विक्रीकरीता गांजा जवळ बाळगणाऱ्या एका महिलेला चाकण पोलिसांनी एक लाख 16 हजार रुपये किमतीचा 2 किलो 320 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.3) सकाळी साडे अकरा वाजता मेदनकरवाडी येथे करण्यात आली. याप्रकरणी नंदा रंगनाथ साळुंके (वय-50 रा. मेदनकरवाडी, ता. खेड), भाऊ मेदगुले (रा. मेदगुलेवाडी ता. शिरुर) यांच्यावर एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हादाखल केला आहे. याबबात पोलीस शिपाई रणधीर माने यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नंदा साळुंके हिला भाऊ मेदगुले याने गांजा विक्री करण्यासाठी दिल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts