IMPIMP

Satara Crime | साताऱ्यातील व्यावसायिकाला 30 लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बनं उडवून देण्याची परदेशातून धमकी

by nagesh
Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन साताऱ्यात एका प्रसिध्द पेढे व्यावसायिकास ३० लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बन उडवून देण्याची परदेशातून धमकी दिल्याचे समोर आले (Satara Crime) आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. व्यावसायिकाने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार (Satara Crime) दाखल केली आहे.

 

गेल्या आठ दिवसापासून मोदी यांना इंटरनॅशनल कॉल येत आहेत. या कॉलवरून तीस लाख रुपये दे, नाहीतर बॉम्ब लावून उडवून देईन, अशी धमकी देण्यात आली. सुरुवातीला त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर रात्री-अपरात्री देखील त्यांना फोन येण्याचे तसेच मेसेज करुन वारंवार तीस लाख रुपये देण्यासाठी धमकावले जाऊ लागले. व्यावसायिकाने या प्रकरणी पोलीस मुख्यालयात याबाबत ई-मेल करुन तक्रार अर्ज पाठवला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या अर्जासोबत त्यांनी १० ते १२ वेळा ज्या नंबरवरून फोन आले तो नंबर,
मेसेज याचे स्क्रीन शॉट देखील जोडले आहेत.
वेगवेगळ्या दोन नंबर वरुन एकाच प्रकारची धमकी दिली जात असल्याचे या अर्जात व्यावसायिकाने म्हटले आहे.
दरम्यान, व्यावसायिकाने मंगळवारी सायंकाळी सायबर पोलीस विभागात जाऊन माहिती (Satara Crime) दिली असून अधिक तपास सुरु झाला आहे.

 

Web Title :- Satara Crime | pedha sweet maker satara got call abroad rs 30 lakh ransom

 

हे देखील वाचा :

EPFO | बँक अकाऊंट आणि PF नंबरद्वारे जाणून घेवू शकता PPO नंबर; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SBI Credit Card | SBI च्या क्रेडिट कार्ड धारकांना दणका ! आता ‘हे’ ट्रान्झॅक्शन महागणार, जाणून घ्या

Rohit Sharma | रोहित शर्माची आज पहिली परीक्षा, ‘या’ 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार ‘हिटमॅन’

 

Related Posts