IMPIMP

तब्बल एका तपानंतर उर्मिला मातोंडकर बॉलीवूडमध्ये करणार COME BACK

by pranjalishirish
bollywood-actor-urmila-matondkar-reveals-she-will-return-to-the-big-screen-soon-says-will-do-something-interesting

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – तब्बल 12 वर्षांनी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर Urmila Matondkar पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. आगामी चित्रपटातून त्या लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या काही वर्षापासून उर्मिला चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या. 2019 साली त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला होता. त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीत परत येतील की नाही? अशी चर्चा होती. मात्र त्या आता दिर्घकाळानंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहेत.

उर्मिला मातोंडकर Urmila Matondkar म्हणाल्या की, मी लवकरच एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत असून लोकांच्या विश्वासावर तो उभा राहील. त्यानिमित्ताने त्या मोठ्या पडद्यावर पुन्हा पर्दापण करणार आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या की, त्या वेबसिरिजचा देखील भाग होणार होत्या. परंतु त्या वेबसीरिजचे शूटींग कोरोनामुळे लांबणीवर पडले आहे. उर्मिला मातोंडकर Urmila Matondkar म्हणाल्या की, बॉलिवूडमध्ये दुसऱ्यांदा पदार्पण करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मला वाटतेय. जेंव्हा मी माझ्या करिअरबद्दल विचार करते तेंव्हा असे वाटते की, मी प्रेक्षकांच्या हृदयात माझी जागा निर्माण केली आहे. माझ्या आतापर्यंतच्या करिअरचा प्रवास खूप शानदार झाला आहे. माझे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहे. मला माहित नाही की माझे पुढचे काम किती यशस्वी होईल,कारण याचा मी कधीही विचार केला नाही.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

Assembly Election 2021 : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला ‘राम राम’

Related Posts