IMPIMP

Photos : माधुरी दीक्षितनं शेअर केले ब्लॅक साडीतील ‘मोहक’ फोटो ! किंमत वाचून चकित व्हाल

by pranjalishirish
fashion-beauty-madhuri-dixit-makes-our-hearts-go-dhak-dhak-in-black-saree

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवूड अक्ट्रेस माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोशल मीडियावरून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. वयाच्या 52 व्या वर्षी देखील ती खूपच यंग अँड ब्युटीफुल दिसते. आपल्या फोटोंमुळं देखील माधुरी अनेकदा चर्चेत आली आहे. आजही तिच्या ब्युटीवर लाखो चाहते फिदा आहेत. पुन्हा एकदा आपल्या काही फोटोंमुळं तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

माधुरीनं Madhuri Dixit तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरची साडी नेसली आहे. या जॉर्जेट साडीत माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. डान्स के दीवाने शोच्या एपिसोडच्या शुटींगसाठी तिनं ही ब्लॅक कलरची साडी नेसली होती. साडीला मॅचिंग असं जॅकेटही तिनं घातलं आहे. ज्यावर खूप छान अशी नक्षी आहे. हा लुक स्टायलिश करण्यासाठी तनं ब्राऊन कलरचा बेल्टही घातला आहे. वयाच्या पन्नाशी पार केलेल्या माधुरीनं पुन्हा एकदा आपल्या लुकनं चाहत्यांना पागल केलं आहे.

डिझायनर तरुण तहिलयानी (Tarun Tahiliani) यानं ही साडी डिझाईन केली आहे. याची किंमत 1 लाख 24 हजार एवढी आहे. सध्या तिच्या या लुकची सोशलवर खूप चर्चा सुरू आहे.

माधुरीचे Madhuri Dixit हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि लुकचं कौतुक केलं आहे.

माधुरीच्या Madhuri Dixit वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 1984 साली आलेल्या अबोध या सिनेमातून तिनं हिंदी सिनेमात पाऊल टाकलं होतं. 1988 साली आलेल्या तेजाब या सिनेमानं तिला ओळख मिळाली. राम लखन, परिंदा, दिल, साजन, बेटा, खलनायक, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास यांसारख्या सिनेमात अप्रतिम अभिनय करणाऱ्या माधुरीनं हिंदी सिनेमात आपलं वेगळं स्थान तयार केलं आहे.

 

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Gold Rates Today : सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनं-चांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर ? जाणून घ्या आजचे भाव

Maharashtra Budget 2021 : विरोधक आक्रमक म्हणताहेत; ‘आज त्यांना आम्ही सोडणार नाही’

Related Posts