IMPIMP

Photos : जान्हवी कपूरच्या बॅकलेस फोटोशुटची सोशलवर जोरदार चर्चा ! तुफान व्हायरल झाले फोटो

by amol
janhvi kapoor

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अनेकदा तिच्या फोटोशुटमुळं चर्चेचा हिस्सा बनली आहे. आपल्या बोल्डनेसमुळं तिनं अनेकदा सोशलवर अटेंशन घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच ती बेली डान्स करताना दिसली होती. पुन्हा एकदा आपल्या एका लेटेस्ट फोटोशुटमुळं ती चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. या फोटोशुमधील जान्हवीचे फोटो सोशलवर व्हायरल चर्चेत आहेत.

जान्हवीनं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जान्हवीनं घातलेल्या ड्रेसची आणि तिच्या लुकची खूप चर्चा सुरू आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं सिल्व्हर टॉप आणि पिंक पॅंट घातली आहे. यात जान्हवी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.

जान्हवीचे (Janhvi Kapoor) हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

जान्हवीच्या (Janhvi Kapoor) वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्ये दिसली होती.
अलीकडेच जान्हवीनं गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलला गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही काम केलं आहे.
या सिनेमात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे.
याशिवाय ती रूही या सिनेमात राजकुमार रावसोबत काम करताना दिसणार आहे.
11 मार्च 2021 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे गुड लक जेरी हा सिनेमाही आहे.

 

Related Posts