IMPIMP

Kantara 2 | रिषभ शेट्टीने कांताराच्या पुढच्या भागाबद्दल केली मोठी घोषणा; ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

by nagesh
Kantara 2 | rishab shetty announces kantara prequel to release in 2024 reveals storyline

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Kantara 2 | गेल्यावर्षी कांतारा हा सिनेमा प्रचंड गाजला होता. अक्षरशः या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटामुळे अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला लोकप्रियता मिळाली. आता कांताराच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता कांताराच्या पुढच्या भागाबद्दल ऋषभ शेट्टीने स्वतः एक मोठी घोषणा केली आहे. आता कांतारा (Kantara 2) या चित्रपटाचा अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टी लवकरच या चित्रपटाचा प्रीक्वल घेऊन येत आहे.

 

‘कांतरा 2’ हा चित्रपट जरी 2 म्हणून असला तरी कांतारा या चित्रपटाच्या आधीचा भाग यामध्ये दाखवण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण ऋषभ शेट्टी यांनी दिले आहे. कांतारा या चित्रपटांमध्ये एका देवतेची पौराणिक कथा सांगण्यात आली होती. सुरुवातीला हा चित्रपट केवळ कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. मात्र याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आणि मागणी यामुळे हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

16 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात प्रदर्शित झाल्यानंतर 400 ते 450 कोटींची विक्रम कमाई केली आहे.
तेव्हापासून चाहते कांताराच्या (Kantara 2) पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तर आता रिषभ शेट्टीने यावर भाष्य करत म्हटले की या चित्रपटाचा पुढचा नाही तर पहिला भाग आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आता येणाऱ्या काळात ‘कांतरा 2’ मध्ये कांताराच्या आधीची कथा दाखवण्यात येणार आहे.
रिषभने सांगितले की कांताराच्या प्रीक्वलची कथा लिहायला सुरुवात झाली आहे.
तर 2024 मध्ये हा प्रिक्वल रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटावर संशोधन सुरू आहे आणि
त्यामुळे आता तरी काही सांगणे चुकीचे ठरेल असे मत ऋषभ शेट्टीने व्यक्त केले.

 

Web Title :- Kantara 2 | rishab shetty announces kantara prequel to release in 2024 reveals storyline

 

हे देखील वाचा :

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या आगामी सिनेमातील ‘मी करते तुम्हाला मुजरा’ लावणी रिलीज ; पहा व्हिडिओ

Vaidehi Parashurami | अखेर वैदेही परशुरामीने यशराज मुखाटे सोबतच्या नात्याविषयी केला मोठा खुलासा

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘दुःख वाटते की पक्षाने माझी दखल घेतली नाही..;’ कसबा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब दाभेकरांनी व्यक्त केली खंत

 

Related Posts