IMPIMP

Photos : ‘बिकिनी’प्रमाणे साडीतही तितकीच ‘बोल्ड’ दिसते मल्लिका शेरावत ! व्हायरल झाले फोटो

by sikandershaikh
mallika-sherawat

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) ओळखली जाते. मल्लिकानं बॉलिवूडमध्ये अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलंय. सध्या मल्लिका चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. असं असलं तरी ती सोशल मीडियावर मात्र सुपरॲक्टीव असते. नेहमीच ती आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. पुन्हा एकदा आपल्या लुकनं तिनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

मल्लिकानं (mallika sherawat ) तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं साडी नेसली आहे. यात तिचा देसी अंदाज पहायला मिळत आहे. फोटोत ती कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. सोशलवर तिच्या या लुकची खूप चर्चा सुरू आहे. बिकिनी असो वा साडी मल्लिका कायमच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

मल्लिकाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटीचं कौतुक केलं आहे.

अलीकडेच मल्लिकानं काही फोटो शेअर केले होते. या फोटोत तिनं एक जाळीदार बिकिनी घातली होती. फोटोत मल्लिका किल्लर फिगर फ्लाँट करताना दिसत होती. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं होतं.

मल्लिकानं काही दिवसांपूर्वीच सोशलवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या फोटोंमध्ये मल्लिका योगासन करताना दिसली होती. कधी कधी ती वर्कआऊट करतानाचे फोटोही सोशलवर शेअर करत असते. मल्लिका एक फिटनेस फ्रिक आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मल्लिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमांपासून दूर असणाऱ्या मल्लिकानं डिजिटल डेब्यू केला आहे.
‘बू-सबकी फटेगी’ या वेबसीरीजमध्ये ती दिसली होती. 2019 मध्ये ही वेब सीरीज प्रदर्शित झाली होती.
अल्ट बालाजीची ही पहिली हॉरर कॉमेडी वेब सीरीज होती. यात मल्लिका भूत बनली होती.
सीरीजमध्ये तिच्याव्यतिरीक्त तुषार कपूर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.
जीना सिर्फ मेरे लिए सिनेमातून तिनं करिअरला सुरुवात केली होती.
यानंतर तिनं ख्वाहिश आणि मर्डर सिनेमातून एक वेगळी ओळख तयार केली आहे.
शादी के साईड इफेक्ट्स, वेलकम, डबल धमाल अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/CLOI2OSp3Qh/

https://www.instagram.com/p/CED9WhKpIq6/

Related Posts