IMPIMP

Riteish Deshmukh – Genelia Deshmukh | अभिनेता रितेश देशमुखने सांगितले त्यांच्या नात्यातील सिक्रेट ; “जेनेलियाने नियम केलाय…”

by nagesh
Riteish Deshmukh - Genelia Deshmukh | rietesh deshmukh talked about his relation with his wife genelia

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती म्हणजे ‘वेड’ या चित्रपटाची, तर या चित्रपटामुळे अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (Riteish Deshmukh – Genelia Deshmukh) हेदेखील काही काळापासून चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता रितेशने त्यांच्यामधील बाउंडिंग बद्दलचे रहस्य सांगितले आहे. (Riteish Deshmukh – Genelia Deshmukh)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘वेड’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख व्यस्त आहेत. एका कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीत रितेशने त्यांच्या नात्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. रितेश म्हणाला, “आमच्यामध्ये जेनेलियाने एक नियमच बनवून ठेवला आहे. एकमेकांना काही भेटवस्तू द्यायची असेल, तर ती 5000 पेक्षा जास्तीची असू नये जर तसे झाले तर वर्षभर पुन्हा काहीच भेटवस्तू एकमेकांना द्यायची नाही. नात्यांमध्ये भेट वस्तूंपेक्षा वेळ एकमेकांना देणे हे खूप महत्त्वाचे असते. एकमेकांना वेळ दिला की नातं आपोआप जपले जातात. नात्यांमध्ये अपेक्षांमुळे दुरावा निर्माण होतो समोरच्याची अपेक्षा वाढू लागली की नात्यांमध्ये दुरावा यायला सुरुवात होते. त्यामुळे अपेक्षाही जितक्यात तितकेच पाहिजे. नात्यांमध्ये कितीही मोठी चूक झाली तर माफ करता यायला पाहिजे. त्यामुळे नातं आणखीनच मजबूत होतं”.

 

 

वेड चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख यांनी केले आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख (Riteish Deshmukh – Genelia Deshmukh) यांच्यासोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकारदेखील दिसणार आहेत, तर या चित्रपटातील गाण्यांना संगीतकार अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात येत्या 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Riteish Deshmukh – Genelia Deshmukh | rietesh deshmukh talked about his relation with his wife genelia

 

 

हे देखील वाचा :

Bhagat Singh Koshyari | वादग्रस्त विधानावरून राज्यपालांचे शहा यांना स्पष्टीकरण

Pune NCP On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांना सन्मति दे भगवान प्रार्थना ! पत्रकारांवरील दबावाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुक आंदोलन

Mrunmayee Deshpande | आता मृण्मयी देशपांडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर; ‘या’ मालिकेत झळकणार

 

Related Posts