IMPIMP

Sunny Kaushal-Sharvari Wagh | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात होणार कौशल कुटुंबाची धाकटी सून, कतरिना कैफनं केला फोटो शेअर

by nagesh
Sunny Kaushal-Sharvari Wagh | vicky kaushal brother sunny kaushal is dating with actress sharvari wagh katrina kaif share photo

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Sunny Kaushal-Sharvari Wagh | नुकताच अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा 9 डिसेंबरला लग्न सोहळा पार पडला. त्यांनी राजेशाही विवाह केला असून, सवाई माधोपूर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये हे लग्न (Vicky-Katrina Marriage) पार पडलं. लग्नाच्या फोटोंनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांच चांगलंच लक्ष वेधलं आहे. (Sunny Kaushal-Sharvari Wagh)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

शर्वरी वाघ (Sharvari Wagh) म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नात. तिनं पूर्ण लग्नामध्ये नेटकर्‍यांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं. या दोघांच्या लग्नामध्ये अगदी मोजक्या लोकांना बोलावलं असून, शर्वरीचा देखील या लग्नात सहभाग होता. ती लग्नासोबतच कतरिनाच्या हळदीच्या समारंभात सुद्धा दिसत होते. (Sunny Kaushal-Sharvari Wagh)

 

 

विकी कौशलचा भाऊ सनी (Sunny Kaushal) आणि शर्वरी (Sharvari Wagh) एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तर लवकरच शर्वरी ही कौशल कुटुंबाची धाकटी सून होणार असल्याच्या तीव्र चर्चा रंगल्या आहे. कतरिनाने शेअर केलेल्या अनेक फोटोमध्ये ती चांगलीच झळकताना दिसत होती. हे फोटो बघून सोशल मीडियावर सनी आणि तिच्या बद्दल पुन्हा जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

 

 

दरम्यान, शर्वरीचा जन्म मुंबईत 14 जून 1996मध्ये झाला असून, तिनं रूपारेलमधून शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर तिनं मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. नुकतच ती ‘बंटी और बबली 2’(Bunty Aur Babli 2) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिच्यासोबत या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), सिद्धांत चतुर्वेदी, सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukharji) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी शर्वरीच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक केलं.

 

 

 

Web Title :- Sunny Kaushal-Sharvari Wagh | vicky kaushal brother sunny kaushal is dating with actress sharvari wagh katrina kaif share photo

 

हे देखील वाचा :

Rohit R Patil | ‘माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत विरोधकांचे काहीच ठेवत नाही’, रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा (व्हिडिओ)

Bombay High Court | अनिल देशमुख प्रकरणात हायकोर्टाचा ठाकरे सरकारला दणका, CBI ला तपास करण्याची मुभा

Money Laundering Case | महाराष्ट्रातील बड्या IPS अधिकाऱ्याला ED चे समन्स, माजी गृहमंत्र्यांशी लागेबांधे?

 

Related Posts