IMPIMP

TMC खासदार अभिनेत्री नुसरत जहाँचे जवळचे मित्र भाजपामध्ये, यश दासगुप्ताने दिले स्पष्टीकरण

by sikandershaikh
nusrat jahan-yash dasgupta

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बंगाली अभिनेता यश दासगुप्ताने (Yash Dasgupta) निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे यश बंगाली सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँ यांचे जवळचे मित्र आहेत आणि दोघांची जवळीक बंगाली चित्रपटसृष्टीत चर्चेत आहेत. नुसरत आणि निखिल जैन यांच्या वैवाहिक जीवनात अडचणीच्या बातमीनंतर यशसोबत तिच्या अफेअरच्या बातम्याही काही काळ सुरू होत्या. मात्र, याबाबत नुसरत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नुसरतने सांगितले की, माझ्या वैयक्तिक जीवनाचे प्रश्न लोकांमध्ये चर्चेसाठी नाहीत. लोक नेहमीच माझा
‘ट्रायल’ घेतात. परंतु मी यावर काहीही बोलणार नाही. माझ्या कामासाठी लोक मला जज करु शकतात.
ते चांगले असो वा वाईट, हे माझे वैयक्तिक जीवन आहे आणि मी हे कोणाबरोबरही शेयर करणार नाही.
दरम्यान, नुसरतने 2019 मध्ये तुर्की येथे उद्योजक निखिल जैनशी लग्न केले.
यानंतर कोलकात्यात लग्नाच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी चर्चेचा विषय बनल्या, जेव्हा नुसरत आणि निखिल यांनी कित्येक महिन्यांपासून सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो पोस्ट केले नव्हते.

नुसरतने यशसोबत (Yash Dasgupta) एसओएस कोलकातामध्ये काम केले होते, रिलीज झाल्यापासून त्यांच्यात अफेअरच्या बातम्या आल्या. काही प्रसंगी दोघेही एकत्र दिसले.
दोघे राजस्थानच्या सहलीला गेले असल्यााचा दावाही मीडियाच्या वृत्तात करण्यात आला.
अलिकडेच भाजपमध्ये सामील झाल्यानंतर यशने नुसरतशी मैत्रीबद्दल म्हटले की, मी माझ्या मानसिकतेसोबत पार्टीत आहे.
फ्रेन्ड मिमी चक्रवर्तीसुद्धा टीएमसी मध्ये आहे. नुसरत बशीरहाटच्या टीएमसी खासदार आहेत.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने IPL च्या लिलावापूर्वी घेतली माघार

Related Posts