IMPIMP

Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ अ‍ॅडव्हायजरी, ‘या’ गुप्तचर संस्थेने जारी केला फ्रॉडचा इशारा

by nagesh
Cryptocurrency | fbi issued warning of fraud know this advisory before investing in Cryptocurrency

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) लोकांची आवड वेगाने वाढत चालली आहे. याचे सर्वात मोठे कारण यात होणारा नफा. क्रिप्टोकरन्सीमध्ये शेयर बाजार (Stock Market) किंवा इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता असते. ज्यामुळे लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) वेगाने गुंतवणुक करत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

परंतु, अलिकडे जगातील सर्वात प्रसिद्ध गुप्तचर संस्था यूएस फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (US Federal Bureau of Investigation – FBI) एक अ‍ॅडव्हायजरी (advisory) जारी केली आहे. ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, स्कॅमर्स (scammers) क्रिप्टोकरन्सीद्वारे आगामी काळात मोठा फ्रॉड करू शकतात (scammers can commit big frauds in the coming time through Cryptocurrency). एफबीआय अ‍ॅडव्हायजरी (FBI advisory) तसेच यापासून वाचण्यासाठी काय करावे ते जाणून घेवूयात…

 

 

एफबीआयने आपल्या अ‍ॅडव्हायजरीमध्ये काय म्हटले…

यूएस फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनने आपल्या अ‍ॅडव्हायजरीत इशारा देताना सांगितले आहे की, स्कॅमर्स फिजिकल क्रिप्टोकरन्सी एटीएम आणि डिजिटल क्यूआर कोडचा वापर करत आहेत.

यासाठी अज्ञात कॉलर्सच्या क्रिप्टो-पेमेंट रिक्वेस्टवर विचार करू नका. सोबतच लोकांनी अशा कॉलर्सला आपली व्यक्तीगत माहित देऊ नये. एफबीआयने स्पष्ट केले आहे की, जर तुम्ही या दोन्ही अ‍ॅडव्हायजरीचे पालन केले तर तुमच्या सोबत फ्रॉड होण्याची शकयता नाहीच्या बरोबर आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

स्कॅमर्स हे सांगून करतात दिशाभूल –

एफबीआयने (SBI) आपल्या इशार्‍यात म्हटले आहे की, स्कॅम करणारे लोकांना पेमेंट रिक्वेस्ट करतात आणि व्हिक्टिमचे फायनान्शियल अकाऊंट्स जसे की इन्व्हेस्टमेंट किंवा रिटायर्मेंट अकाऊंटमधून पैसे काढण्यास सांगतात.

यासाठी स्कॅमर व्यवहाराच्या दरम्यान क्रिप्टोकरन्सी वॉलेटसंबंधी क्यूआरकोड देतात. ज्यास व्हिक्टिम बळी पडल्यानंतर कोणतीही कारवाई करू शकत नाही.

 

क्रिप्टो ओनर्सने ही कामे टाळावीत –

एफबीआयनुसार क्रिप्टो ओनर्सने त्या एटीएम मशीनचा वापर करू नये, ज्या केवळ फोन नंबर आणि ईमेल आयडीच्या आधारावर व्यवहाराची परवानगी देतात. अशा क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) एटीएम अमेरिकन फेडरल रेग्युलेशनचे पालन करू शकत नाहीत. आणि मनी लाँड्रिंगची सुविधा देऊ शकतात. अशा प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी एटीएमचा वापर फसवणुकीचे कारण ठरू शकतो.

एफबीआयच्या अ‍ॅडव्हायजरीत म्हटले आहे की, स्कॅमर्स आपली खरी ओळख लपवण्यासाठी सर्वप्रकारचे कम्युनिकेशन ऑनलाइन ठेवण्याचा प्रयत्न करतात.
ज्याद्वारे त्यांना ट्रेस करणे खुप अवघड होते.
तसेच अनोळखी व्यक्ती स्वता सरकारी अधिकारी किंवा खासदार असल्याचे सांगत असतील तरी त्यांना कोणत्याही प्रकारचे फंडिंग किंवा डोनेशन देऊ नका.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

अमेरिकेत (America) अनेक ठिकाणी क्रिप्टोकरन्सी एटीएम (Cryptocurrency ATM) आहेत.
यामध्ये चलन बदलणे आणि इतर व्यवहार करता येतात.
क्रिप्टोकरन्सी सध्या डिसेंट्रलाईज्ड आहे, यासाठी लॉक झाल्यास रक्कम पुन्हा मिळवणे अवघड आहे.
स्कॅमर्सना त्यांचे क्रिप्टो पेमेंट ताबडतोब मिळते, ज्यानंतर ते ताबडतोब आपल्या इतर खात्यात पैसे जमा करतात.
या स्थितीत पीडित व्यक्तीकडे आर्थिक नुकसानीशिवाय काहीही शिल्लक राहात नाही.

 

Web Title: Cryptocurrency | fbi issued warning of fraud know this advisory before investing in Cryptocurrency

 

हे देखील वाचा :

Maharashtra Corona Vaccination | महाराष्ट्राने केला व्हॅक्सीनेशनचे 10 कोटी डोस देण्याचा विक्रम; राजेश टोपे आरोग्य कर्मचार्‍यांना म्हणाले – ‘शाब्बास’ !

Nilofer Malik | अमृता फडणवीसांच्या ‘बिगडे नवाब’ ट्विटला नवाब मलिकांची मुलगी निलोफरनं दिलं उत्तर, म्हणाल्या…

Nawab Malik | नवाब मलिकांचे अमृता फडणवीसांना उत्तर; म्हणाले – ‘वरळी इथं 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे?’

 

Related Posts