IMPIMP

Maharashtra Corona Vaccination | महाराष्ट्राने केला व्हॅक्सीनेशनचे 10 कोटी डोस देण्याचा विक्रम; राजेश टोपे आरोग्य कर्मचार्‍यांना म्हणाले – ‘शाब्बास’ !

by nagesh
Maharashtra Corona Vaccination | maharashtra crossed benchmark of administration of 100 million covid vaccine doses

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Maharashtra Corona Vaccination | महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरण्याच्या मार्गावर आहे. वेगवान लसीकरण मोहिमेमुळे हे यश मिळाला आहे. महाराष्ट्राने मंगळवारी (9 नोव्हेंबर) कोरोना व्हॅक्सीनचे 10 कोटी डोस देण्याचा विक्रम (Maharashtra Corona Vaccination) केला. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope, Health Minister) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांच्या व्हॅक्सीनेशनचा विक्रम केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो.

राज्याने 10 कोटींचा आकडा पार केला असला तरी यापैकी केवळ 3 कोटी 20 लाख 74 हजार 504 लोकांनाच व्हॅक्सीनचे दोन्ही डोस मिळाले आहेत. 6 कोटी 80 लाख 53 हजार 77 लोकांना कोरोनाचा पहिला डोस मिळाला आहे.

 

 

मुंबई, पुण्यात सर्वात वेगाने होतेय लसीकरण

राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वात वेगाने लसीकरण होत आहे. मुंबईत 1 कोटी 49 लाख 92 हजार 825 डोस देण्यात आले आहेत. पुण्यात 1 कोटी 22 लाख 33 हजार 340 डोस दिले आहेत.

 

औरंगाबादमध्ये सक्ती करणार

औरंगाबादमध्ये लसीकरण कमी होण्याची तक्रार वारंवार समोर येत होती.
येथे आता लसीकरण वेगाने करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
ज्या लोकांना व्हॅक्सीन (Maharashtra Corona Vaccination) किमान एक डोस घेतला आहे आता त्यांनाच पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळेल.
पहिल्या डोसच्या प्रमाणपत्राची तपासणी करून मगच वरील सेवा दिल्या जातील.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Maharashtra Corona Vaccination | maharashtra crossed benchmark of administration of 100 million covid vaccine doses

 

हे देखील वाचा :

Nilofer Malik | अमृता फडणवीसांच्या ‘बिगडे नवाब’ ट्विटला नवाब मलिकांची मुलगी निलोफरनं दिलं उत्तर, म्हणाल्या…

Nawab Malik | नवाब मलिकांचे अमृता फडणवीसांना उत्तर; म्हणाले – ‘वरळी इथं 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे?’

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगतापच्या बॉडीगार्डचा उपचारादरम्यान मृत्यू

 

Related Posts