IMPIMP

Mutual Funds | १५X१५X१५ गुंतवणुकीचा नियम तुम्हाला बनवू शकतो करोडपती, जाणून घ्या काय आहे?

by sachinsitapure

नवी दिल्ली : Mutual Funds | प्रत्येकाची अपेक्षा असते की किमान रिटायर्डमेंटला करोडपती व्हावे. परंतु चुकीची गुंतवणूक केल्यास हे स्वप्न पूर्ण होत नाही. योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास हे स्वप्न सहज पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला १५X१५X१५ चा नियम (How works 15x15x15 Investing Rule) पाळावा लागेल. त्यानुसार १५ वर्षांचा कालावधी, १५ हजार रुपयांची एसआयपी (SIP) आणि १५ टक्के वार्षिक रिटर्नच्या आधारावर गुंतवणूक केली पाहिजे.

एका वर्षात १.८ लाख रुपयांची गुंतवणूक
तुम्ही दर महिन्याला १५ हजार रुपयांची एसआयपी केल्यास वर्षभरात १.८ लाख रुपयांची गुंतवणूक करता. अशाप्रकारे तुम्ही १५ वर्षात एकुण २७ लाख रुपये जमा करता. जर यावर वार्षिक १५% रिटर्न मिळाला तर १५ वर्षानंतर तुमचे २७ लाख रुपये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त होतील.

कोणत्याही गुंतवणुकीसाठी १५ वर्षांचा कालावधी आदर्श मानला जातो. या दरम्यान तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्ण लाभ मिळतो. हे पूर्ण गणित अंदाजावर आधारित आहे. बाजाराची स्थिती आणि तुम्ही निवडलेल्या म्यूचुअल फंडच्या आधारावर रिटर्न बदलू देखील शकतो.

दिर्घ कालावधीत स्टॉकमधून चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता असते. परंतु, जर तुम्ही तुमचा पैसा बाँडमध्ये गुंतवला तर तुम्हाला रिटर्न कमी मिळेल, परंतु पैसा सुरक्षित राहिल.

याशिवाय तुम्हाला तुमची रिस्क घेण्याची क्षमता देखील विचारात घेतली पाहिजे. कमी रिस्क पसंत करणारे लोक बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात. परंतु, जास्त जोखीम घेण्याची तयारी असेल तर तुमची रिटर्नची शक्यता वाढते.

Related Posts