IMPIMP

PMJJBY | सरकारची स्कीम, अवघ्या ४३६ रुपयात मिळेल २ लाखाचा विमा, जाणून घ्या प्रोसेस

by sachinsitapure
Insurance Policy

नवी दिल्ली : PMJJBY | केंद्र सरकार (Central Government) देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना PM Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY).

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सरकार या विमा योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक विभागातील नागरिकांना अत्यंत कमी रकमेत विमा उपलब्ध करून देते. कोणताही नागरिक केवळ ४३६ रुपये वार्षिक भरून २ लाख रुपयांपर्यंतचा विमा घेऊ शकतो. सरकारने २०१५ मध्ये जीवन ज्योती विमा योजना सुरू केली.

दरवर्षी द्यावे लागतील इतके पैसे

जीवन ज्योती विमा योजनेची पॉलिसी घेण्यासाठी दरवर्षी ४३६ रुपये भरावे लागतात. २०२२ पूर्वी पॉलिसी खरेदी करण्यासाठी फक्त ३३० रुपये द्यावे लागायचे. ते सरकारने नंतर वाढवून ४३६ रुपये केले. या विम्याचा प्रीमियम १ जून ते ३० मे पर्यंत वैध आहे. या योजनेद्वारे तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन किंवा तुमच्या बँकेच्या नेट बँकिंगद्वारे घरी बसून ही पॉलिसी घेऊ शकता.

(Jeevan Jyoti Insurance Policy) जीवन ज्योती विमा पॉलिसी १८ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती खरेदी करू शकतात.
जीवन ज्योती विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटीचे वय ५५ वर्षे आहे. हा टर्म प्लान दरवर्षी रिन्यू करावा लागतो.
एखाद्या वर्षात प्रीमियम जमा न केल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही आणि स्कीम बंद मानली जाईल.

किती रकमेवर करू शकता दावा?

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत, पॉलिसी धारक व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास
नॉमिनीला दोन लाख रुपयांपर्यंतचा इन्श्युरन्स क्लेम मिळतो. या इन्श्युरन्सचा प्रीमियम १ जून ते ३० मे पर्यंत वैध असतो.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही मोदी सरकारचा टर्म इन्शुरन्स प्लान (Term Insurance Plan) आहे.

टर्म प्लॅन म्हणजे, विमा पॉलिसीदरम्यान पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच विमा कंपनी विम्याची रक्कम देते.
जीवन ज्योती विमा योजना पूर्ण झाल्यानंतरही पॉलिसीधारक हयात असेल तर त्याला कोणताही लाभ मिळत नाही.

हे कागदपत्र आवश्यक

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत (PMJJBY) पॉलिसी घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो,
बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

Related Posts