IMPIMP

Income Tax Refund | इन्कम टॅक्स रिटर्न मिळणार लवकर; आयकर विभागातर्फे केला जाऊ शकतो कालावधीमध्ये बदल

by sachinsitapure
Income Tax Refund

सरकारसत्ता ऑनलाईन – Income Tax Refund | आयकर विभागातर्फे या आर्थिक वर्ष 2022-23 चे इन्कम टॅक्स जमा करण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोडो रुपयांचा टॅक्स जमा झाला असून ज्यांनी तो अद्याप भरला नाही त्याच्यासाठी दंडाची रक्कम देखील जाहीर करण्यात आली आहे. आता सर्व टॅक्स पेयर्स इन्कम टॅक्स रिटर्नची (Income Tax Refund) वाट पाहत आहेत. आयकर विभाग (Income Tax Department) सातत्याने हा परतावा जारी करत आहे. आता विभागातर्फे रिफंडच्या वेळेच्या बाबतीत मोठे बदल करण्यात येणार आहे. महसूल विभाग या प्रक्रियेसाठी लागणार 16 दिवसांचा अवधी केवळ 10 दिवस करण्याच्या मार्गावर आहे. असे झाल्यास याचा परिणाम अनेक टॅक्स भरणाऱ्या कंपनींवर व व्यक्तींवर होणार आहे. विभागाच्या या नवीन निर्णयाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सध्या इन्कम टॅक्स रिटर्न मिळवण्याकडे करदात्यांचे लक्ष लागले आहे. आयकर विभागातर्फे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधी दरम्यान, आयटी विभागाने एकूण 72,215 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिटर्न जारी केला आहे. त्यामुळे अनेक लोकांनी याचा प्रत्यक्ष फायदा देखील मिळवला आहे. विभागाकडून देण्यात आलेल्या या रिटर्नमध्ये 37,775 कोटी रुपयांचा परतावा कंपन्यांना तर 34,406 कोटी रुपयांचे रिटर्न हे वैयक्तिक करदात्यांना देण्यात आले आहे.

या इन्कम टॅक्स रिटर्न मुळे आयकर विभागाकडे एकूण 5.88 लाख कोटी रुपयांचा कर संकलन झाले आहे. विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या या रिटर्नच्या कालावधीमध्ये घट करण्याच्या (Reduction in Tax Return Period) निर्णयाचा चांगला फायदा करदात्यांना होणार आहे. आधी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 16 दिवस लागत होते. आता मात्र नवीन निर्णयानुसार फक्त 10 दिवस लागणार आहेत. इन्कम टॅक्स रिटर्नची पूर्ण प्रोसेस ही अत्याधुनिक व इलेक्ट्रिक झाल्याने हा कालावधी कमी झाला असून हे विभागासाठी देखील सोयीचे ठरणार आहे. कर परतावाचा कालावधी कमी झाल्यास टॅक्सपेयर्सला परतावा लवकर मिळणे शक्य होईल व आयकर विभाग कोणत्याही त्रासाशिवाय सहजपणे परतावा देण्यास सक्षम होईल.

आयकर विभागाकडून दिल्या जाणाऱ्या या इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटस पाहणे देखील अगदी सोपे आहे.
आयटीआर रिफंड स्टेटस (ITR Refund Status) ऑनलाइन तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in जाणे गरजेचे आहे.
या अधिकृत वेबसाईट वरुन तुम्ही तुमचा आयटीआर रिफंड (Income Tax Refund) आला आहे हे पाहू शकता.
ही प्रक्रिया करताना सोबत आधार कार्ड (Aadhaar Card) व पॅन कार्ड (PAN Card) असणे गरजेचे आहे.
आयटीआर रिफंड स्टेटस चेक करताना काळजीपूर्वक विचारलेला सर्व तपशील भरल्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटस
पाहता येईल.

Katraj Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती! 50 पोलीस कर्मचाऱ्यांसह महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती

Pune Police MCOCA Action | पर्वती भागात दहशत माजविणाऱ्या संकेत लोंढे व त्याच्या इतर 6 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 53 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

Credit Card Update | आत्ता तुम्ही देखील वाचवू शकता क्रेडिट कार्डवरील इंटरेस्ट; रक्कम हस्तांतरित करण्याची नवीन सुविधा उपलब्ध

IPO News | १८० पट सब्सक्रिप्शन, आयपीओ खरेदी करण्यासाठी चढाओढ, भाव ८३ रुपये

Related Posts