IMPIMP

Breastmilk | बाळ जन्माला येताच महिलेच्या अंडरआर्ममधून येऊ लागले दूध, अतिशय दुर्मिळ आहे हा निसर्गाचा चमत्कार

by nagesh
Breastmilk | two days after delivery milk started coming out of the woman underarm know the reason behind it

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Breastmilk | परदेशी मीडियानुसार, पोर्तुगालमध्ये एका 26 वर्षीय महिलेच्या काखेतून दूध येत आहे (Breastmilk is coming out from woman’s armpits). मुलाला जन्म दिल्यानंतर दोन दिवसांनी या महिलेच्या उजव्या अंडरआर्ममध्ये वेदना होऊ लागल्या. तिने ही समस्या डॉक्टरांनी सांगितली. डॉक्टरांनी तपासणी केली असता आढळले की महिलेच्या अंडरआर्ममध्ये एक थैली आहे जी दाबल्यानंतर तिच्यातून दूधासारखा द्रव बाहेर येत आहे. या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

घाबरण्याचे कारण नाही

डॉक्टरांनी सांगितले की, महिेलेच्या काखेतून ब्रेस्टमिल्क निघत आहे (Breastmilk is coming out from woman’s armpits).
पोर्तुगालच्या लिस्बनयेतील हॉस्पिटल डी सांता मारियाच्या डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली.
त्यांनी म्हटले, तिच्या शरीरात अतिरिक्त ब्रेस्ट टिश्यू (पॉलीमॅस्टिया) आढळल्या आहेत.
मात्र, घाबरण्याचे कारण नाही, पॉलीमॅस्टियामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या स्क्रीनिंगमध्ये अतिरिक्त टिश्यूंची सुद्धा तपासणी आवश्यक आहे.

 

 

जगात 6 टक्के महिलांना होतो हा प्रॉब्लेम

एका रिपोर्टनुसार, जगात 6 टक्के महिला अशाप्रकारच्या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीत जन्म घेतात. यास एक्सेसरी ब्रेस्ट टिश्यू सुद्धा म्हटले जाते.
अतिरिक्त स्तन ऊतींच्या काही प्रकरणात एक निप्पल किंवा एरोला (निप्पलच्या जवळपासचे रंगद्रव्य क्षेत्र) चा समावेश असतो, मात्र काही महिलांमध्ये निप्पल किंवा एरोलाशिवाय केवळ स्तन ऊती असतात.

 

 

का होते महिलांमध्ये ही समस्या?

भ्रूणाच्या विकासाच्या दरम्यान अशी स्थिती तेव्हा होते जेव्हा स्तन ग्रंथी बनवणार्‍या पेशी शरीराच्या दोन्ही बाजूला आणि काखेपासून कमरेपर्यंत एक रेषा बनवत असतात.
सामान्यपणे ही ’मॅमरी रिज’ किंवा ’मिल्क लाईन’ भ्रूण वाढल्यानंतर गायब होते, ती केवळ स्तनांच्या जवळपास असते.
मात्र, कधी-कधी असे होत नाही आणि मिल्क लाईन शरीराच्या इतर भागात तशीच राहते ज्यामुळे तिथे अतिरिक्त स्तन ऊती तयार होतात.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

गरोदर राहिल्यानंतरच समजते

सामान्यपणे हे महिलांच्या अंडरआर्ममध्येच आढळते. महिलांना याची जाणीव तोपर्यंत होते नाही जोपर्यंत त्या गरोदर राहात नाहीत. या अतिरिक्त स्तन ऊतींवर निप्पल किंवा एरोला नसते.
असेच एक प्रकरण अमेरिकेच्या लॉस एन्जलिसमधून समारे आले होते.
जिथे एका महिलेच्या अंडरआर्म्समध्ये सुद्धा स्तन आले होते. सामंथा जेव्हा पहिल्या वेळी गरोदर राहिली, तेव्हा तिच्या अंडरआर्म्समधून सुद्धा स्तन निघाले होते. सामंथाच्या त्या स्तनातून दूध निघत होते.
नंतर ऑपरेशन करून ते काढण्यात आले.

 

 

Web Title : Breastmilk | two days after delivery milk started coming out of the woman underarm know the reason behind it

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police | दुर्देवी ! जीममध्ये व्यायाम करताना सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांचे निधन

Crime News | माहेरी गेलेली पत्नी घरी यावी म्हणून लहान मुलांच्या जीवाशी अघोरी कृत्य, बाप ‘गोत्यात’

Maharashtra Mantralaya | मंत्रालयातील तळीरामांना शोधण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts