IMPIMP

Crime News | माहेरी गेलेली पत्नी घरी यावी म्हणून लहान मुलांच्या जीवाशी अघोरी कृत्य, बाप ‘गोत्यात’

by nagesh
Pune Crime | 22 years old boy wears undergarments of house owner woman and makes photo session, makes obscene gestures by speaking in dirty voice, molestation case registered in wanwadi police station

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Crime News | माहेरी गेलेली पत्नी पुन्हा घरी यावी यासाठी पित्याने लहान मुलांच्या जीवाशी खेळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पित्याने आठ वर्षाच्या मुलाला जमिनीवर झोपवून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असल्याचे भासवणारा फोटो पत्नीला पाठवला. तर १३ वर्षाच्या मुलीला गळ्याला फास लावण्याचे नाटक करण्यास भाग पाडले. हा प्रकार शेजारी रहाणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी मुलांची सुटका केली. दरम्यान, पोलिसांनी या पित्याला अटक (Crime News) केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुरारमध्ये राहणाऱ्या सूचित गौड हा दारूच्या आहारी गेला आहे. दारूच्या नशेमध्ये तो पत्नी आणि मुलांना वारंवार मारहाण करत असे. सूचितच्या वागण्याला कंटाळून त्याची पत्नी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती. काही दिवसानंतर सूचित गावाला जाऊन दोन्ही मुलांना घेऊन मुंबईत आला. मुलांना आणल्यामुळे पत्नीदेखील आपोआप येईल, असे त्याला वाटले. मात्र पत्नी येण्यास तयार नव्हती.

 

 

पत्नी परत यावी म्हणून त्याने आपल्या मुलाला घरात जमिनीवर झोपवून अंत्यविधी होत असल्याचे
भासवण्यासाठी त्याच्यावर सफेद कापड, हार घातले आणि तो फोटो व्हाट्सअ‍ॅप वरून पत्नीला
पाठवला. परंतु तरीही पत्नी काही ऐकायला तयार नव्हती. म्हणून त्याने शक्कल लढवत सूचितने
पंख्याला ओढणी बांधून त्याखाली टेबलावर मुलीला उभे केले आणि गळ्यात फास लटकविण्यास भाग
पाडू लागला. मात्र मुलीने घाबरून आरडाओरडा सुरू केला. ‘फास गळ्यात टाकला नाही, तर पंखा चालू करेन’ अशी धमकी सूचित मुलीला देऊ लागला. मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत मुलीची सुटका केली. कुरार पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सूचीतला अटक केली.

 

Web Title : Crime News | man fakes kids deaths to get wife back home

 

हे देखील वाचा :

Maharashtra Mantralaya | मंत्रालयातील तळीरामांना शोधण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Indian Railways | IRCTC ने ऑनलाइन ट्रेन तिकिट बुकिंगचे ‘हे’ नियम बदलले, करावे लागेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | बजाज कंपनीच्या बनावट अकाउंटद्वारे फसवणूक

Pune News | क्रिकेटच्या क्लासला जात असलेल्या 18 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, 11 वर्षीय भाऊ गंभीर जखमी; गॅरेज चालकाला अटक

 

Related Posts