IMPIMP

Coronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे

by omkar
Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours in the state 3,933 patients ‘corona’ free, learn other statistics

सरकारसत्ता ऑनलाइन – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ने सावध केले आहे की कोविड-19 संकट अजून समाप्त झालेले नाही आणि जर महामारी ( Pandemic) ची तिसरी लाट आली तर तिचे गंभीर परिणाम होतील. ( Pandemic) व्हायरसचा उच्च स्तरावरील प्रसार पाहता तिसरी लाट येणे अनिवार्य आहे, परंतु हे स्पष्ट नाही की तिसरी लाट केव्हा येईल आणि कोणत्या स्तराची असेल. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा केंद्र सरकारला यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

Devendra Fadnavis : ‘प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला’ (व्हिडीओ)

अशी घ्या काळजी
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, बदलत्या व्हायरसची ( Epidemic ) प्रतिक्रिया समान राहते.
आपल्याला कोविड-उपयुक्त वर्तणूक अवलंबण्याची आवश्यकता आहे,
जसे मास्क घालणे, अंतर पाळणे, स्वच्छता, अनावश्यक भेटीगाठी टाळणे आणि घरात राहणे.

मास्क घालणे आवश्यक
सीएसआयआरने सुद्धा म्हटले की, भारत सध्या सामुदायिक प्रतिकार क्षमता मिळवण्यापासून दूर आहे.
अशावेळी लोकांना व्हायरसच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे.
सतत हात धुतले पाहिजेत.

स्पर्श करणे टाळा
शक्य असेल तर घराच्या बाहेर पडू नका आणि जात असाल तर मास्क घाला आणि सॅनिटायजर सोबत ठेवा. कोणत्याही वस्तूला स्पर्श करणे टाळा.

एक मीटरचे अंतर ठेवा
संक्रमित लोक आणि इतर लोकांपासून किमान एक मीटरचे अंतर ठेवा.
शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रूमाल किंवा टिश्यू ठेवा. टिश्यू योग्य ठिकाणी टाका.

फुफ्फुसांना जपा
तुमचे आरोग्य अगोदरपासूनच बिघडलेले असेल तर घरातच रहा.
स्मोकिंग टाळा आणि फुफ्फुसांना प्रभावित करणार्‍या वस्तूंपासून दूर रहा.

मुलांसाठी तिसरी लाट धोकादायक (Pandemic)
कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी जास्त धोकादायक मानली जात आहे.
यासाठी अनेक राज्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे.
यामुळे पालकांमध्ये सुद्धा चिंतेचे वातावरण आहे.
मुलांना सध्याच्या प्रोटोकॉलनुसार लस देता येत नाही.
सोबतच त्यांच्यासाठी विशेष औषध तयार झालेले नाही.
यासाठी मुलांमध्ये कोरोनाची जोखीम रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे.

मुलांची इम्युनिटी वाढवा
तिसर्‍या लाटेपासून वाचण्यासाठी मुलांची इम्यूनिटी वाढवण्यावर डॉक्टर जोर देत आहेत.
डॉक्टरांनुसार, तुम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंत मुलांना सप्लीमेंट देऊ शकता.
यात 15 दिवसासाठी जस्त, एक महिन्यासाठी मल्टीव्हिटॅमिन आणि एक महिन्यासाठी कॅल्शियम दिले जाऊ शकते.
या सर्व गोष्टी प्रतिकारशक्ती वाढवू शकतात.
मात्र, डॉक्टर व्हिटॅमिनच्या नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करण्याचा सल्ला सुद्धा देत आहेत.

मुलींची अशी काळजी घ्या
याशिवाय कोरोना नियमांचे पालन करणे मुलांसाठी एक सवय बनवण्याची आवश्यकता आहे.
छोट्या मुलांना बाहेरून आलेल्या लोकांपासून दूर ठेवा, मग त्यांना लक्षणे असो किंवा नसो.
सोबतच मुलांना सर्दी-खोकला, ताप आणि पोटाच्या आजारांपासून वाचवा.

चांगला आहार घ्या, इतर आजार टाळा
असे यासाठी कारण हे आजार रोग प्रतिकारशक्तीचे नुकसान करतात.
यासाठी मुलांना जास्त थंड पाणी अणि तेलकट जेवण देऊ नका.
त्याऐवजी आहारात डाळ, भाजी, आणि फळे द्या.

Also Read:- 

राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? ‘राहुल-प्रियांका’ यांच्यात नावावरून मतभेद

नारायण राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट, म्हणाले…

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश

Internet Media : ‘ईस्ट इंडिया कंपनी’प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल सतत होतंय महाग, मोडले सर्व रेकॉर्ड

गरीब, वंचितांसाठी मोदी सरकारचं विशेष अभियान ! बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

 

Related Posts