IMPIMP

Skin Care Tips | उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची घ्या काळजी ! कोरफड आणि भाताचे पाणी वापरा अन् त्वचा ठेवा चमकदार

by Team Deccan Express
Skin Care Tips | aloe vera and rice water are extremely beneficial for the skin

 सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Skin Care Tips | उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याबरोबरच त्वचेची (Skin) काळजी देखील तितकीच घ्यावी लागते. आपली त्वचा चमकदार ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो. या दिवसात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. मात्र त्वचेच्या सर्व समस्या या हंगामामध्ये दूर करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Skin Care) अत्यंत फायदेशीर असतात. त्यामुळे कोरफड (Aloe Vera) आणि भाताचे पाणी (Rice Water) खूप अधिक फायदेशीर (Beneficial) असते. कोरफड आणि भाताच्या पाण्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. नेमका याचा फायदा (Skin Care Tips) कसा होतो? याबाबत जाणून घ्या.

 

– कोरफड आणि भाताच्या पाण्यामुळे त्वचेवरील टॅन दूर होतो (Aloe Vera And Rice Water Removes Skin Tan)

उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेवर येणारा घाम यामुळे चिडचिडेपणासोबतच खाज येऊ शकते. अशा परिस्थितीत त्वचेला आराम देण्यासाठी तांदळाचे पाणी आणि कोरफडीचे जेल फायदेशीर ठरते (Skin Care Tips).

 

प्रक्रिया काय (What A Process) ?

भाताचे ताजे पाणी घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे कोरफड जेल मिक्स करणे आवश्यक आहे. ही पेस्ट आता आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. या फेसपॅक मुळे (Face Pack) त्वचेवरील टॅन जाण्यास मदत होते.

 

– कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते (Helps To Get Rid Of Dry Skin Problem)

भाताचे पाणी नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते. ते अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते. तसेच, भाताच्या पाण्याचा वापर सनबर्नवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

 

प्रक्रिया काय?

एका भांड्यात तांदळाचे पाणी घ्या आणि त्यात 1 चमचा कोरफडीचे जेल टाका, नीट मिक्स केल्यानंतर काही वेळ राहू द्या, चेहऱ्यावर लावण्यापूर्वी ते धुण्यास विसरू नका. असे केल्याने चेहऱ्यावरील घाण चेहऱ्याच्या आत जाणार नाही. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी राहू द्या. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Skin Care Tips | aloe vera and rice water are extremely beneficial for the skin

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts