IMPIMP

Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

by nagesh
Kolhapur Megholi Irrigation Project | leakage in megholi irrigation project a woman washed away in water

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन  Kolhapur Megholi Irrigation Project | ओढ दिलेल्या पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या (Kolhapur Megholi Irrigation Project) भिंतीला गळती लागली होती. मध्यरात्री प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटला. पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर शेकडो एकर शेतजमीन वाहून गेली आहे. तर अनेक जनावरे दगावली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटला आहे. बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.गळतीमुळे संपूर्ण रात्रभर ग्रामस्थांनी जागून काढली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, बंधारा फुटल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातून १२ नद्या वाहतात. त्यामुळे विविध लघु पाटबंधारे सुद्धा बांधण्यात आले आहेत.काही वर्षांपूर्वीच मेघोली धरण बांधण्यात आल होत. त्याला गळती लागल्याची माहिती पूर्वीच प्रशासनाला दिली गेली होती.

 

Web Title : Kolhapur Megholi Irrigation Project | leakage in megholi irrigation project a woman washed away in water

 

हे देखील वाचा :

Pune News | बिबट्याच्या हल्लयात राजगुरुनगरमध्ये महिला ठार

CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं

Diabetes Control | स्वयंपाक घरातील ‘हे’ 4 मसाले डायबिटीजवर ‘रामबाण’, जाणून घ्या फायदे

 

Related Posts