IMPIMP

ACB Trap News | शिक्षण सह संचालकासह तिघे अँन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

by nagesh
ACB Trap

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – शिक्षण संस्थेत नव्याने सुरू केल्या जाणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी आवश्यक सुविधा असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी (Demand a Bribe) करुन 30 हजार रुपये स्वीकारताना (Accepting Bribe) कोल्हापूर विभागाच्या शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण-Higher Education) कार्यालयातील कनिष्ठ लिपिक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. ही रक्कम विभागीय शिक्षण सहसंचालक (Joint Director of Education) हेमंत कठरे (Hemant Kathare) आणि त्याचा स्टेनोग्राफर यांनी मागितल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने (ACB Trap News) तिघांना अटक (Arrest) केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

विभागीय शिक्षण सहसंचालक हेमंत नाना कठरे Hemant Nana Kathre (वय 46, सध्या रा. अंबाई डिफेन्स, राऊत कॉलनी, कोल्हापूर, मूळ रा. पाचवड, ता. खटाव, जि. सातारा), स्टेनोग्राफर (Stenographer) प्रवीण शिवाजी गुरव Praveen Shivaji Guruv (वय 32, रा. पीरवाडी, ता. करवीर मूळ रा. महमंदापूर, ता.भुदरगड, जि. कोल्हापूर) आणि कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) अनिल दिनकर जोंग Anil Dinkar Jong (वय 34, रा. राशिवडे, ता. राधानगरी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत 57 वर्षाच्या व्यक्तीने कोल्हापूर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्या शैक्षणिक संस्थे अंतर्गत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस (Hotel Management Courses) करिता आवश्यक त्या सोयी सुविधा आहेत अगर कसे याची तपासणी करून प्रमाणपत्र देणेसाठी स्टेनोग्राफर प्रवीण गुरव याने विभागीय शिक्षण सहसंचालक प्रवीण कठरे यांच्यासाठी 50 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम कनिष्ठ लिपिक अनिल जोंग यांच्याकडे देण्यास सांगितले.

तक्रारदार यांनी कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap) तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पडताळणी केली.
त्यावेळी स्टेनोग्राफर गुरव याने सहसंचालक कठरे यांच्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडी अंती 30 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी (दि.5) सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना लिपिक जोंग याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर हेमंत कठरे आणि प्रवीण गुरव यांना अटक करण्यात आली. विभागीय शिक्षण सहसंचालक एसीबीच्या कारवाईत अडकल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB)
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve),
अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी (Addl SP Vijay Chaudhary)
यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर एसीबीचे उपअधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale),
सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे (ASI Prakash Bhandare), पोलीस अंमलदार विकास माने,
सुनिल घोसाळकर, रुपेश माने, मयूर देसाई, संदीप पवार, उदय पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title : ACB Trap News | Three on anti-corruption’s radar with joint director of higher education

Related Posts