IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांचा लवकरच 3 % वाढू शकतो DA, वार्षिक 90,000 रुपयांपर्यंत फायदा; जाणून घ्या कॅलक्युलेशन

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission latest news da of central employees may soon increase by three percent benefit up to rs 90000 annually

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission | डिसेंबर 2021 साठी AICPI डेटा जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे आता निश्चित झाले आहे की, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात 3 टक्के DA चा लाभ लवकरच मिळणार आहे. काही रिपोर्ट सांगतात की, मार्चमध्ये होळीच्या वेळी केंद्रीय कर्मचार्‍यांना ही वाढ मिळू शकते. मात्र, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ करण्याबाबत सरकारकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. (7th Pay Commission)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

AICPI डेटा पाहिला तर, 2022 मध्ये या वर्षी 3 टक्के DA ची वाढ निश्चित आहे. मात्र सरकार कधी निर्णय घेणार हे अवलंबून आहे. सध्या कर्मचार्‍यांना 31 टक्के डीए दिला जात असून, त्यात 3 टक्क्यांनी वाढ होऊन तो 34 टक्के होईल. कामगार मंत्रालयानुसार, डिसेंबर 2021 मध्ये AICPI-IW मध्ये वाढ झाली आहे. यामुळे तो वाढून 125.4 झाला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचा DA 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे मानले जात आहे.

 

DA कधी बदलतो ?
महागाई भत्त्याबाबत बोलायचे तर कर्मचार्‍यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो.
हा भत्ता सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांना दिला जातो.
महागाई भत्ता देण्यामागचे कारण म्हणजे कर्मचार्‍यांना महागाईत सामान्य जीवन जगताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये.
सामान्यत: महागाई भत्ता Dearness Allowance दर 6 महिन्यांनी जानेवारी आणि जुलैमध्ये बदलला जातो. (7th Pay Commission)

 

यांना मिळेल वार्षिक 90 हजार रुपयांचा लाभ
3% डीए वाढवण्याची घोषणा झाल्यास कर्मचार्‍यांना पगारात मोठा दिलासा मिळणार आहे.
जर एखाद्या कर्मचार्‍याचा मूळ पगार दरमहा 30,000 रुपये असेल तर त्याच्या पगारात दरमहा 900 रुपयांची वाढ होईल.
म्हणजेच एका वर्षात 10,800 रुपये नफा होईल.
त्याचबरोबर कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकार्‍यांच्या पगारात दरमहा 7500 रुपयांची वाढ होणार आहे.
म्हणजेच त्यांचा वार्षिक हिशेब काढला तर 90 हजार रुपये पगारात फायदा होईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कशी होते DA ची गणना
महागाई भत्त्याची टक्केवारी = गेल्या 12 महिन्यांतील CPI च्या सरासरी – 115.76. यानंतर, एकूण 115.76 ने भागले जाईल. आता निकाल येईल त्यास 100 ने गुणाकार केला जाईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission latest news da of central employees may soon increase by three percent benefit up to rs 90000 annually

 

हे देखील वाचा :

Praveen Kumar Death News | महाभारतातील ‘भीम’चे निधन, अमिताभ-जितेंद्र यांच्यासोबत सुद्धा केले होते काम

Aadhaar Not Mandatory For Covid Vaccination | कोरोना व्हॅक्सीनसाठी ‘आधार’ कार्ड अनिवार्य नाही, ‘या’ 9 कागदपत्रांपैकी कोणत्याही एकाचा करू शकता वापर; जाणून घ्या

Weight Loss | काजू खाल्ल्याने वजन वाढते का? जाणून घ्या सत्य

 

Related Posts